झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर परभणी गुन्हे शाखेचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

झन्नामन्ना जुगार खेळना-या इसमांवर स्थानिक गुन्हेशाखेचा छापा ११ जुगारींना ताब्यात घेऊन,४.६९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५) रोजी अशोक घोरबांड पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांना गूप्तबातमीदारकडून गोपनीय माहीती मिळाली की, पो. स्टे. परभणी ग्रामीण हददीतील मौजे तरोडा शेत शिवारात मूंजा खवले यांचे शेतातील लिंबाचे झाडाखाली, तरोडा शिवारात १५ ते १८ इसम पैशाने झन्नामन्ना नावाचा जूगार खेळत आहेत





अशा सदरच्या माहीतीची शहानीशा करुन खात्री पटताच पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना कळविली व सदर ठिकाणी छापा टाकणेकरीता . त्यावरून पोनि अशोक घोरबांड यांचे अधिनस्थ असलेल्या पोलिस पथकासह वर नमुद ठिकाणी दुपारी ४.१५ वा. चे सुमारास रवाना होऊन  सदर माहीती मिळाल्या ठिकाणी जाऊन ५.१५ वा. छापा मारला असता, सदर ठिकाणी १५ ते १८ इसम स्वतःच्या फायदयासाठी पैशाने झन्नामन्ना नावाचा जुगार खेळताना दिसले पोलिसांना  पाहून ते पळाले. सदर पळणा-या लोकांपैकी ११  इसमांना जागीच पकडले व बाकीचे लोक पळून गेले.



सदर पकडलेल्या इसमांना  त्यांचे नावे, पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) दिपक मूरलीधर रसाळ वय २८ वर्षे धंदा शेती रा.नांदापूर ता. जि. परभणी २) गजानन रामचंद्र इंगळे वय ४७ वर्षे धंदा व्यापार रा. कारेगाव ता. जि. परभणी ३)क्रिष्णा ऊर्फ प्रमोद लक्ष्मणराव भोंग वय २३ वर्षे धंदा मजूरी सर्व रा. हिंगला ह. मू. प्रतापनगर परभणी ४ ) सिध्दांत बापूराव एंगडे वय २३ वर्षे धंदा मजूरी रा. हाडको, परभणी ५ ) वसीम अहमद शफीक अहमद कुरेशी वय ३४ वर्षे धंदा व्यापार रा. उस्मानिया कॉलनी, परभणी ६ ) प्रवीण किशन मोरे वय ४३ वर्षे धंदा व्यापार रा.गौतमनगर परभणी ७) शेख गौष शेख गुलाब वय २६ वर्षे धंदा ड्रायव्हर रा. आझाद कॉर्नर, गडी मोहल्ला परभणी ह. मू. एक मिनार मस्जीदजवळ, धार रोड परभणी ८) शिवाजी भगवान काकडे वय २४ वर्षे धंदा शेती रा. साटला ता. जि. परभणी ९) किफायतखॉ अब्दुल्लखाँ पठाण वय ४५ वर्षे धंदा ड्रायव्हर रा. जूना मोंढा नेहरू पूतळा, गंगाखेड जि. परभणी १०) महेश मारोतराव जगलपूरे वय २४ वर्षे धंदा व्यापार रा. ममता कॉलनी, गंगाखेड जि. परभणी ११) अंकूश व्यंकटराव मोरे वय ३९ वर्षे धंदा ड्रायव्हर रा. जनाबाई मंदीरजवळ, गंगाखेड जि. परभणी असे असल्याचे सांगितले त्यांचेकडे आम्ही पळालेल्या इसमांची नावे विचारले असता, त्यांनी पळालेल्या इसमांची नावे १२) कलीम कुरेशी रा. विसावा कॉर्नर, परभणी १३) भिमा मोरे रा. पोखर्णी १४) शेख इरफान रा. पोखर्णी १५) यशवंत खाडे रा. मातोश्रीनगर, परभणी १६) नंदकुमार ऊर्फ नंदू नावंदर रा. सारडा कॉलनी, गंगाखेड जि. परभणी १७ ) अजहर रा. साकलाप्लॉट, परभणी १८) देवानंद विठठलराव चव्हाण रा. मातोश्रीनगर, परभणी असे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी पकडलेल्या इसमांच्या ताब्यातुन नगदी १,०२,२००/- रूपये, १२ मोबाईल हँडसेटस, ३ मोटार सायकल्स, एक नायलोन ग्रीन मॅट, ५२ पत्त्याचा कॅट असे एकुण ४,६९,२००/- रु चा मुद्देमाल मिळून आला



सदर कामगिरी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी,अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, स.पो.नि. पी.डी.भारती,पोहवा रंगनाथ दूधाटे, राहूल परसोडे, तूपसूंदरे,पोशि गायकवाड, दिलीप निलपत्रेवार, हनुमान ढगे, चापोशि कैलास केंद्रे यांनी पार पाडली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!