आग लागलेल्या फ्लॅट मधून वृद्ध महिलेची एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केली सुटका…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

आग लागलेल्या फ्लॅट मधून वृद्ध महिलेची एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केली सुटका…

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे कडील शाहुनगर बीट मार्शल वरील कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार पोशि तानाजी दयानंद बनसोडे व पोशि मच्छिंद्र चिंतु टिके यांना डायल ११२ चे एम.डी.टी. वर कॉल प्राप्त झाला की, शाहुनगर एच.डी.एफ.सी कॉलनीचे पाठीमागे एका सोसायटीचे फ्लॅट मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असुन पोलीस मदत हवी आहे. त्या वर लगेच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार तेथे जाऊन अरण्यम सोसायटी शाहूनगर चिंचवड येथील फ्लॅट मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेमध्ये वयोवृध्द महिलेची सुखरूप सुटका करून तिचा जीव वाचवला आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.२०मे) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे कडील शाहुनगर बीट मार्शल वरील कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार पोशि तानाजी दयानंद बनसोडे व पोशि मच्छिंद्र चिंतु टिके यांना डायल ११२ चे एम. डी. टी. वर (दि.२०मे) रोजीचे दुपारी १२:५१ वा.सू. कॉल प्राप्त झाला की, शाहुनगर एच.डी.एफ.सी कॉलनीचे पाठीमागे एका सोसायटीचे फ्लॅट मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असुन पोलीस मदत हवी आहे, असा कॉल प्राप्त झाले नंतर पोशि तानाजी दयानंद बनसोडे व पोशि मच्छिंद्र चिंतु टिके असे त्वरीत कॉल पॉईंट ठिकाणी पोहचले असता अरण्यम सोसायटीचे बिल्डींगचे दुस-या मजल्यावरील एका फ्लॅट चे खिडक्यांमधुन आगीचे लोट व धुर बाहेर येत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे पोशि बनसोडे यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधुन फायर बिग्रेडची व अधिक पोलीस मदतीचे आवश्यकता असल्याचे कळविले व नमुद दोन्ही पोलीस अंमलदार यांनी प्रथमतः सोसायटी मध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅसचे जोडणी असलेले पाईप लाईन कनेक्शन बंद करुन घेतले व त्या नंतर सोसायटीचे बाहेर जमलेल्या लोकांपैकी कोणीतरी त्यांना सांगितले सोसायटीचे आत मध्ये लोक आहेत. त्यामुळे पोशि तानाजी दयानंद बनसोडे यांनी त्यांचे सोबतचे पोशि मच्छिंद्र चिंतु टिके यांना सोसायटीचे पार्किंग मधील गाडया व बिल्डींगचे खाली जमलेले लोक यांना गेटचे बाहेर काढण्यास सांगितले व ते स्वतः बिल्डींगचे जिन्याने आग लागलेल्या फ्लॅट मध्ये गेले. तेव्हा सदर फ्लॅट मध्ये पोशि बनसोडे यांना एक वयोवृदध महिला मदतीचे वाट पाहत असल्याचे मिळून आल्या असता त्यांनी सदर महिलेस खांदयावर उचलुन घेऊन बाहेर पडत असताच तेथे गॅस सिलेंडरची टाकी त्यांना दिसुन आली. गॅस सिलेंडरचे टाकीमुळे स्फोट होऊन आणखी आग मोठ्या प्रमाणात भडकण्याची शक्यता असल्याने त्यांनी फ्लॅट मधील वृदध महिलेस खांदयावर घेवुन दुस-या हातात गॅस सिलेंडरची टाकी उचलुन घेवुन जिन्याने खाली येवुन पार्किंग मध्ये आणुन सोडले.



तेव्हा सोसायटीचे आवारात बिल्डींगमधील खाली आलेल्या रहिवाशी यांनी बिल्डींगमधील काही लोक हे आगीचे भितीने टेरेसवर गेल्याचे सांगितले तेव्हा पोशि बनसोडे यांनी तत्परतेने बिल्डींगचे दुस-या जिन्याने टेरेसवर जावुन तेथे थांबलेल्या रहिवाशांना सुखरुप पणे खाली आणून सोडले. बिल्डींगचे दुस-या मजल्यावरील फ्लॅट मध्ये लागलेल्या आगीचा लोट शेजारील फ्लॅट मध्ये जात असल्याने त्यास आग लागलेली होती व त्या फ्लॅट मध्येही दोन गॅसचे सिलेंडर असल्याची माहिती मिळाल्याने पोशि तानाजी बनसोडे यांनी अग्निशामक दलाचे कर्मचारी यांचे मदतीने सदरचे दोन्ही सिलेंडर जिन्याने खाली आणले त्यामुळे आग आणखी वाढण्याचा मोठा धोका टळला.



तेवढयात सदर ठिकाणी पिंपरी चिंचवड मनपाचे अग्निशामक दलाचे गाडया पोहचल्या होत्या व पोलीस ठाणेकडील इतर अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवुन आम्ही स्वतः वपोनि गणेश जामदार असे पोहोचलो होतो. तसेच सदर ठिकाणी डॉ. शिवाजी पवार, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पिंपरी चिंचवड यांनी स्वतः भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन आग आटोक्यात आणण्याचे अनुषंगाने योग्य त्या सुचना दिल्या व नागरिकांशी सुसंवाद साधुन संपुर्ण परिस्थिती आटोक्यात आणली.

अशा प्रकारे सदरची उल्लेखनीय कामगिरी विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ.शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, पिंपरी चिंचवड, सचिन हिरे, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी एमआयडीसी विभाग, यांचे सूचना व मार्गदर्शनानुसार गणेश जामदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे, संतोष इंगळे, पोलीस उपनिरीक्षक, पंडीत आहिरे, पोशि तानाजी बनसोडे व पोशि मच्छिंद्र टिके, पोशि धनराज बनसोडे, पोहवा निलेश अरगडे, मपोहवा लता पारधी यांनी मिळून केली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पंडीत आहिरे, पोलीस उप निरीक्षक एमआयडीसी भोसरी पोस्टे. हे करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!