IPL जुगारावर गिट्टीखदान पोलिसांचा छापा…
आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्याला अटक गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात…
नागपूर (शहर प्रतिनिधी) – पोलिस स्टेशन गिट्टीखदान नागपूर शहर येथे आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करून त्याच्याकडून सोनी कंपनीचा मोबाईल, एक एअरटेल कंपनीचा सेटटॉप बॉक्स, रिमोट, ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण २६ हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांतर्फे फिर्यादी सपोनि चेतन बोरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गिटीखदान पोलिस ठाण्यात अप क्र ३९२/२०२४ कलम ४,५ म.हा. जु.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत अधिक माहिती अशी की, दि(२४) रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि चेतन बोरखेडे हे पथकासह यांचेसह पो.स्टे. हद्दीत दरम्यान पेद्रोलिंग करीत असतांना माहीती मिळाली की चावला भवन,काटोल रोड येथील हनुमान मंदीराजवळ काही ईसम आयपीएल च्या सामन्यावर जुगार खेळत आहेत अशा मिळालेल्या बातमीवरुन सपोनि चेतन बोरखेडे पथकासह घटनास्थळी रवाना होऊन त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे काही ईसम टि.व्हि. वर राजस्थान रॉयल्स व सनराईजर्स हैदराबाद या क्रिकेट सामन्यावर मोबाईलदवारे लोकांकडुन पैशांची खायवाडी करीत असतांना मिळून आला त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सचिन सुरेन्द्र चावला वय ३५ रा.चावलानगर,हनुमान मंदीराचे बाजुला काटोल रोड नागपुर असे सांगीतले त्याचे ताब्यातुन सोनी कंपनीचा टिव्ही,, एक एअरटेल कंपनीचा सेटटॉप बॉक्स, रिमोट, ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण २६,३००/- रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर इसमाचे कृत्य हे महा जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे होत असल्याने आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद गुन्हयाचा तपास सुरू आहे
अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अप्पर पोलिस आयुक्त,उत्तर विभाग प्रमोद शेवाळे, पोलिस उपायुक्त परी.२ राहुल मदने , सहाय्यक पोलिस आयुक्त,सदर विभाग माधुरी बाविस्कर,वरिष्ठ पोलिस निरिक्षक विनोल कालेकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेन्द्र बोबडे, पो.स्टे. गिट्टीखदान, नागपूर शहर याचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि चेतन बोरखडे.पोहवा बलजित ठाकुर,अजय यादव, इशांक आटे, नापोशि विशाल नांदेकर, पो.शि. आकाश लोथे, सचिन खडसे,नागनाथ कोकरे यांनी केली