
प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा कॅब चालक अखेर गजाआड…
प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा कॅब चालक अखेर गजाआड…
पिंपरी चिंचवड (प्रतिक भोसले) – कॅबमध्ये बसलेल्या प्रवासी महिलेचा एकटेपणाचा फायदा उचलुन वाहनामध्ये विनयभंग केल्या प्रकरणी कॅब चालकास देहूरोड पोलिसांनी अटक केली. ही घटना (दि.१४ मे) रोजी देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या घटनेनंतर आरोपी आपले अस्तित्व लपवून फिरत होता. राहुल पांडुरंग म्हस्के, रा.थेरगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, देहुरोड पोलिस स्टेशन गु.रजि. नं. २७२/२०२४ कलम ३५४ भा.द.वि अन्वये दाखल गुन्हयातील फिर्यादी महीला यांनी (दि.१४मे) रोजी फिर्याद दिली होती की, फिर्यादी या कोरेगाव पार्क येथे आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरीता कॅब क्र.एम.एच.१४ एल.बी. ४१३३ याने जात असताना कॅब चालक राहुल पांडुरंग म्हस्के, रा.थेरगाव, पिंपरी-चिंचवड पुणे याने सदरची कॅब कोरेगाव पार्क दिशेने न नेता उलट दिशेने देहुरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणली सदर महीलेच्या एकटेपणाचा फायदा उचलुन त्याच वाहनामध्ये विनयभंग केला. त्या नुसार सदरचा गुन्हा देहुरोड पोलिस स्टेशन येथे दाखल झाला होता.

गुन्हा दाखल झाले पासुन कॅब चालक आरोपी राहुल पांडुरंग म्हस्के, रा.थेरगाव, पिंपरी- चिंचवड, पुणे हा आपले अस्तीत्व लपवुन पुणे शहरात वावरत होता त्याचा कोणताही प्रकारचा संपुर्ण पत्ता व माहीती नसताना देहुरोड पोलिस स्टेशनचे तपास पथकाच्या अधिकारी अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन सदर आरोपीचा पत्ता शोधुन काढुन त्यास शिताफीने पकडुन दाखल गुन्हयामध्ये अटक केली आहे. तसेच गुन्हयामधील वापरती कॅब क्र.एम.एच. १४ एल.बी.४१३३ ही सुध्दा अटक आरोपीकडुन जप्त केली आहे.

अशा प्रकारे सदरची कामगिरी पोलिस आयुक्त, विनयकुमार चौबे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त, देहुरोड विभाग घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय वाघमारे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोउपनि पी.टी खनसे, पोलिस अंमलदार प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, संतोष जाधव, सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, निलेश जाधव, मोहसीन अत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे यांनी केली आहे.


