
अवैधरित्या विक्रीकरीता गोमांसाची वाहतुक करणाऱ्यास भद्रावती पोलिसांनी घातल्या बेड्या…
गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीकरीता नेणारा आरोपी भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथकाचे ताब्यात,३६० किलो गोंमास जप्त करुन केले नष्ट….
नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे व त्यांचे मांस विक्री करणारे आरोपींवर कडक कारवाई करणेबाबत तसेच आयुक्तालय हद्दीत दिवसा व रात्री प्रभावीपणे गस्त घालुन गोवंशीय जनावरांची कत्तल व त्यांचे मांस विक्रीस कायमचा प्रतिबंध करणेबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सक्त आदेश दिले होते.


त्याअनुषंगाने पोलिस उपायुक्त परीमंडळ १ किरणकुमार चव्हाण, सहा. पोलिस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव, , अति. कार्यभार सरकारवाडा विभाग,प्रभारी पोलिस निरीक्षक भद्रकाली पोलिस स्टेशन संतोष नरूटे, पोलिस निरीक्षक(प्रशासन) विक्रम मोहीते, भद्रकाली यांचे मार्गदर्शना नुसार गुन्हे शोध पथकाचे पोहवा संदीप शेळके,नापोशि महेशकुमार बोरसे, पोशि सागर निकुंभ, गुरू गांगुर्डे, जावेद शेख योगेश माळी असे दि. (२९) रोजी चौकमंडई भागात गस्त करीत असतांना सकाळी ११:४० वा. चे सुमारास पोशि योगेश माळी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की एक पांढऱ्या रंगाची ओमीनी कार त्यामध्ये गोवंशीय जनावरांचे मांस भरून सारडा सर्कल ते दुधबाजार कडे जाणारे रोडने येत आहे

अशा खात्रीशीर माहीतीवरुन गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हे लागलीच हाजी टी पॉईंट समोर येवुन थांबले असता थोडयाच वेळात सारडा सर्कल बाजुकडुन येणाऱ्या एक पांढऱ्या रंगाची ओमीनी कार क्र. MH-15-AH-4117 हीचेवरील चालकास त्यांनी हाताचा इशार करून थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु सदर चालकाने कार न थांबविता तो जास्त वेगात पळु जावु लागल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी तिचा पाठलाग करून ११:४० वा. मौलाबाबा जिमचे बाजुला मनपा मटन मार्केटकडे जाणारे रोडवर, भद्रकाली, नाशिक येथे थांबवुन सदर ओमीनी कार चालकास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव फिरोज मजीद कुरेशी, वय ४३ वर्षे, रा. गल्ली नं. १, सादीकनगर,
वडाळागाव, नाशिक असे असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्याचे ओमीनी कारची पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे ३६० किलो वजनाचे गोवंशीय जनावराचे मांस मिळुन आल्याने त्याबाबत त्याचेकडे विचारता त्याने सदरचे मांस हे गायीचे असल्याचे सांगितले तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्याबंदी कायदा लागु असतांना सदर आरोपीने नमुद कायद्याचे उल्लंघन करून व सदर मांसापासुन सामान्य जनतेच्या जिवीतास धोका असलेल्याने रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव असतांनाही त्याने गोवंशीय जनांवरांची बेकायदेशीररित्या कत्तल केलेले अंदाजे ३६० किलो वजनाचे गोवंशीय मांस भरून त्याची विक्री करण्याचे
उद्देशाने वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यास सदर मांस व त्याचे ताब्यातील ओमीनी कारसह ताब्यात घेवुन त्याचेविरूध्द
भद्रकाली पोलिस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १८६ / २०२४ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ (क)९ (अ), सह भा.दं.वि. कलम २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोहवा संदीप शेळके हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त,परीमंडळ १ किरणकुमार चव्हाण, सहा पोलिस आयुक्त, पंचवटी विभाग, अति. कार्य. सरकारवाडा विभाग, नितीन जाधव
प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष नरूटे, पोलिस निरीक्षक,(प्रशासन) विक्रम मोहीते,भद्राकाली पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहवा संदीप शेळके, नापोशि महेशकुमार बोरसे, पोशि सागर निकुंभ, योगेश माळी, गुरू गांगुर्डे,जावेद शेख,नारायण गवळी यांनी पार पाडली


