
सराईत वाहन चोरट्यांना अटक करुन पारडी पोलिसांनी उघड केले ५ दुचाकी चोरीचे गुन्हे….
सराईत दुचाकी चोरट्यांना पारडी पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले एकुण ०५ दुचाकी चोरीचे गुन्हे….
नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२५)मे मध्यरात्री चे दरम्यान, पोलिस ठाणे पारडी हद्दीत प्लॉट नं. १६८, अंबे नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी भिमराज सोमाजी सोनटक्के वय ४१ वर्ष यांचे साळयाने त्यांची हिरो पॅशन गाडी क्र. एम.एच ३५ जे २६९४ किंमती २०,००० /- रू ची लॉक करून घरा समोर पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात आरोपीने त्यांची गाडी चोरून नेली. त्यांनी पोलिस ठाणे पारडी येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.


गुन्हयाचे तपासात पोलिस ठाणे पारडी येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना भांडेवाडी रेल्वे स्टेशन जवळील पटरीवर काही ईसम वाहनासह संशयीतरित्या दिसुन आले.त्यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी त्याचे नाव १) गुरूदेव उर्फ मिर्ची खुशाल जांभुळे वय २० वर्ष रा.जयदुर्गा नगर, भांडेवाडी, नागपूर २) आदित्य राजेराम शिंदे वय १९ वर्ष रा. सुंदर नगर, भांडेवाडी, नागपूर ३) क्रिष्णा उर्फ चुटी राजु प्रजापती वय १८ वर्ष रा. दुर्गानगर, पारडी, नागपूर असे सांगीतले. त्यांना ताब्यात घेवुन त्याचे जवळील
वाहना संबंधी विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील वाहन त्यांचे दोन विधीसंघर्षित साथीदारासह मिळुन केल्याचे सांगीतले. आरोपीची अधिक सखोल विचारपूस केली असता, त्यांनी या गाडी व्यतीरिक्त १)पोलिस ठाणे पारडी हद्दीतुन अॅक्टीव्हा गाडी क्र. एम.एच ४० ए.एच २०३४ किंमती ४०,००० /- रू ,२) पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीतुन एक अॅक्टीव्हा गाडी क्र. एम.एच ४९ आर १३९९ किंमती ४०,००० /- रू ची, ३) पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीतुन हिरो मेस्ट्रो गाडी क्र. एम.एच ४९ टी ०३१० किंमती ४०,००० /- रू ची, ४) पोलिस ठाणे लकडगंज हद्दीतुन हिरो मेस्ट्रो गाडी क्र. एम. एच ४९ क्यू १३९२ किंमती ४०,०००/- रू ची, चोरी केल्याची कबुली दिली.आरोपीचे ताब्यातुन वरील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले तसेच त्यांचे ताब्यातुन एकुण ०५ चोरी केलेली वाहने एकुण किं. २,००,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पोलीस ठाणे पारडी येथील गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(उत्तर प्रभाग)प्रमोद शेवाळे,पोलिस उप आयुक्त (परि क्र. ५)निकेतन कदम, सहायक पोलिस आयुक्त (कामठी विभाग)विशाल क्षिरसागर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन पारडी चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक. रंजीत सिरसाठ, पोउपनि अरविंद कोल्हारे, पोहवा. संदीप लांडे, नापोशि. शैलेष कुंभलकर,पोशि निखील मोहिते व योगेश बोरेकर यांनी केली.



