
संशयीत ईसमास ताब्यात घेऊन चाळिसगाव ग्रामीण पोलिसांनी उघड केला दागिणे चोरीचा गुन्हा
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी संशयीत ईसमास ताब्यात घेऊन उघड केला चोरीचा गुन्हा…
चाळीसगाव(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(26) मे रोजी फिर्यादी मुजाहीद जमशेद शेख, वय-३०, धंदा- मौलाना, मूळ रा. पिंपरखेड, ह.मु. तरवाडे, ता. चाळीसगांव. यांनी चाळीसगांव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, दि(१६)मे रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे राहते घरातून १) १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळसुत्राची पोत व ७ ग्रॅम वजनाचे कानातील रींग असे ६०,०००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत.यावरुन पोलिस स्टेशन चालीसगाव ग्रामीण येथे भादवि कलम ३८०नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता


सदर गुन्हयात काहीही पुरावा नसतांना चाळीसगांव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ५ दिवसांत तपासाची चक्रे फिरवून गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयीत शाहरुख शेख लाल शेख, वय २५, रा. तरवाडे, ता. चाळीसगांव यांस दिनांक ३०/०५/२०२४ गुन्ह्याकामी ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदरची चोरी केल्याचे कबुल केले यावरुन त्यास गुन्ह्यात अटक करुन त्याची पोलिस कस्टडी रिमांड मिळवून त्याच्या ताब्यातुन गुन्ह्यातील चोरलेला माल १) १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळसुत्राची पोत व ७ ग्रॅम वजनाचे कानातील रिंग्ज असे ६०,०००/- रु. किमतीचे सोन्याचे दागिने असा हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वरी रेड्डी,अपर पोलिस अधीक्षक,चाळीसगाव परीमंडळ कविता नेरकर,सहा पोलिस अधीक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,चाळीसगांव अभयसिंह देशमुख,यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन,चालीसगाव ग्रामीण सपोनि प्रविण दातरे,पोउपनि कुणाल चव्हाण,पोहवा जयेश पवार, युवराज नाईक संदिप ईश्वर पाटील, शांताराम पवार,विजय शिंदे,सुनिल पाटील सर्व नेमनुक चाळीसगांव ग्रामीण पोस्टे यांनी केली पुढील तपास सपोनि प्रविण दातरे यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा जयेश पवार हे करीत आहेत.



