नाशिक मध्ये मित्रांनीच काढला मित्राचा काटा,तीन अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नाशिक मध्ये मित्रांनीच काढला मित्राचा काटा, तिघांना घेतले ताब्यात…

नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून १७ वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. ही घटना पेठ रोडवरील कर्णनगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली, पोलिसांनी या प्रकरणी तपास घेत तीन जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हे सगळे मित्रच होते, त्यांनी मागील भांडणाच्या कारणावरून हे केलं आहे.





या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, (दि.३०मे) रोजी २१:३० वाजेच्या सुमारास आपला सार्वजनिक वाचनालया समोर, कर्णनगर, पंचवटी, नाशिक येथे आशिष रणमाळे, (वय १७ वर्षे) हा मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असतांना मागील भांडणाच्या कारणावरून, ३ युवकांनी त्यांच्या कडील काहीतरी धारदार हत्याराने आशिष रणमाळे या युवकाचे छातीवर, पोटावर, हातावर व डोक्यात वार करून त्यास गंभीर जखमी करून जिवे ठार मारले होते. सदर संशयितांविरूध्द दशरथ बाबुराव रणमाळे याचे तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाणे येथे गुन्हा रजि.नं. ३५१/२०२४ भादविक.३०२,३४ सह महा.पो. अधिनियम कलम १३५ अन्वये नोंद करण्यात आला होता.



सदर संवेदनशील गुन्हयाचे अनुषंगाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परी.१, किरणकुमार चव्हाण, सहा.पोलिस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव, यांनी सदर गुन्हयातील संशयित आरोपींचा शोध घेवुन तात्काळ अटक करणेबाबत मार्गदर्शक सुचना दिल्या होत्या. पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयातील  संशयितांचा शोध घेण्याकरीता पंचवटी पोलिस स्टेशन कडील पथके रवाना करण्यात आली होती.



सदर गुन्हयातील संशयितांचा शोध घेत असतांना, सपोनि. विलास पडोळकर यांना हल्ला करणारे ३ युवक हे महालक्ष्मी वडापाव सेंटर, नाशिक येथे असल्याची माहिती प्राप्त झाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली महालक्ष्मी वडापाव सेंटर येथे सपोनि. विलास पडोळकर, सफौ. संपत जाधव, पोहवा महेश नांदुर्डीकर, पोहवा सागर कुलकणी,दिपक नाईक, पोशि साबळे, महाले, नापोशि राकेश शिंदे, पोशि अंकुश काळे, कुणाल पचलोरे, नितीन पवार, या  पथकाने सापळा रचुन गुन्हयातील ३ संशयित ताब्यात घेतले, त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली, सदरचे ३ युवक हे विधी संघर्षित बालक असल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पंचवटी पोलिस ठाणे येथे आणले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी ही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त परी १ किरणकुमार चव्हाण, सहा.पोलिस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव, वपोनि. मधुकर कड, पंचवटी पोलिस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिस ठाणेकडील सपोनि. विलास पडोळकर,सफौ.अशोक काकड, संपत जाधव, पोहवा सागर कुलकर्णी, अनिल गुंबाडे,दिपक नाईक,महेश नांदुर्डीकर,संतोष जाधव,कैलास शिंदे, नापोशि निलेश भोईर,यतीन पवार,जयवंत लोणारे,राकेश शिंदे,पोशि गोरक्ष साबळे,अंकुश काळे, कुणाल पचलोरे, शाम महाले,नितीन पवार यांनी पार पाडली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि. विलास पडोळकर हे करत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!