
आममुख्त्यार पत्राच्या गैरवापरातील मुख्य आरोपी नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
आममुख्त्यार पत्राच्या गैरवापरातील मुख्य आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात…
आममुखत्यार पत्राचा गैरवापर करुणार्यांवर गुन्हे दाखल…

नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपूर शहर आर्थिक गुन्हे शाखेने आममुख्त्यार पत्रामध्ये खाडाखोड करून दिशाभुल करून संबंधितांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी फिर्यादी – संदीप देवगडे, रा. पांढूर्णा, तह.कामठी जि.नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाठोडा, नागपूर शहर पोलिस ठाण्यात भा.दं.सं. २९५/२०२४ कलम ४०६,४२०, ४६५,४६७,४६८,४७१, ३४ भादवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी संदीप देवगडे यांनी त्यांचेकडील जमीन संबंधी गैरअर्जदार यांचेसोबत केलेल्या आममुखत्यार पत्राचा दुरूपयोग करून फिर्यादी यांचे मालकीची जमीन हडपण्याचे उद्देशाने सदर आममुख्त्यार पत्रामध्ये खाडाखोड करून दिशाभुल करुन आममुख्त्यार पत्रामध्ये नमूद केलेल्या चर्तुसिमेतील जागेव्यतिरीक्त दुस-याच ०२ एकर जमीनीचे विक्रीपत्र हे तत्कालीन दुय्यम निबंधक भिवगडे यांचेशी संगनमत करुन सदर दस्तामध्ये खाडाखोड असतांना सुध्दा त्या बाबत जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता तत्कालीन दुय्यम निबंधक आरोपी क्रमांक ४ श्री. भिवगडे यांनी दुय्यम निबंधक कार्यालय कामठी येथे दस्त क्र.६५१३/२०२३ अन्वये आरोपी क्र.१ मोहम्मद रफीक वल्द शेख अब्दुल्ला यांचे नावावर करण्यास मदत केली. व त्यानंतर आरोपी क्र १ मोहम्मद रफीक वल्द शेख अब्दुल्ला याने आममुख्त्यारपत्रा मध्ये जमीनीचा कोणताही दर ठरलेला नसतांना फिर्यादीला कोणतीही माहिती नसताना फिर्यादीचे बँक खात्यामध्ये एकूण २५ लाख रूपये वळते केले.
सदर गुन्हयातील आरोपींनी संगणमत करून फिर्यादी व शासनाचा विश्वासघात करून संदीप देवगडे यांची ०२ एकर जमीन किं.अंदाजे १,२३,९७,०००/- रु. ची फसवणुक केल्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडील सपोनि सचिन तडाखे व तपास पथक यांनी आरोपी क्र.१ मोहम्मद रफीक वल्द शेख अब्दुल्ला यास सदर गुन्हयात अटक केली आहे. तसेच आरोपी क्र.३ लिलाधर ज्ञानेश्वर मेंढेकर, रा.दुबे नगर, नागपूर यास सदर गुन्हयात अटक केले असुन न्यायालयाने (दि.३०मे) रोजी पर्यंत आरोपीचा २ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिला असुन तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त डॅा रविंद्र सिंघल,सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त(गुन्हे) संजय पाटील,पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून सदर प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली होती व गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. सचिन तडाखे, आर्थिक गुन्हे शाखा हे करत आहेत.


