
सहा.पोलिस अधिक्षक सावनेर यांचे पथकाचा खापा येथील जुगार अड्डयावर छापा…
सहा.पोलिस अधिक्षक सावनेर यांचे पथकाचा खापा हद्दीत जुगार अड्डयावर छापा,सहा जुगारींसह १ लक्ष ११ हजार रु चा मुद्देमाल केला जप्त…
खापा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(९) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की खापा येथे बाजार चौकात काही ईसम जुगार खेळताय यावरुन त्याचे आदेशाने त्यांचे पथकाने
पोस्टे खापा हद्दीत गोपनीय सूत्रधाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बाजार चौक खापा येथील गाडीगोणे किरानादुकानासमोरील नितेश नंदनवार यांचे जुने घरात छापा कार्यवाही केली असता


तिथे काही इसम हे ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळताना दिसुन आले. त्यामध्ये आरोपी १) लिलाधर महादेव शोधले वय ४२ वर्ष रा.कोथूळना ता. सावनेर जि. नागपूर २) विजय दयाराम निस्ताने वय ३९ वर्ष रा. निमतलाई ता. सावनेर जि. नागपुर ३)सुभाष मोहन पराते वय ५० वर्ष, रा. वार्ड नं ९ किल्लापुरा ता. सावनेर जि. नागपुर ४) गणेश सुखदेव बांगडे वय ३४ वर्ष, रा. वार्ड नं १ गडेवालपुरा खापा ता. सावनेर जि. नागपुर ५) नितेश सुधाकर नंदनवार वय ३२ वर्ष, रा वार्ड नं २ देना बँक जवळ बाजार चौक खापा ६) नरेन्द्र बुलकाजी पराते वय ६० वर्ष, रा वार्ड नं ८ खेडकर ले आउट सावर ता सावनेर जि नागपुर हे हारजितचा जुगार खेळ खेळतांनी मिळुन आल्याने आरोपींच्या ताब्यातून ५२ ताशपत्ते व एकुण नगदी १०९५०/- रु व मोबाईल कि एकुण २०५०० /- रु तसेच घटनास्थळावरुन उभे असलेले मो.सा क्र एम. एच. ४० बी. ए ३०९६ अंदाजे कि ३०००० /- रु तसेच मोसा क्र एम एच ४० / बी. वाय. ८९५० अंदाजे क ३५०००/- रु तसेच मो.सा क्र एम. एच ४० / क्यु २७६५ अंदाजे कि. १५००० /- रु असे एकुण किं १,११,४५० रु. चा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरूद्ध पोस्टे खापा येथे कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार,अपर पोलिस
अधिक्षक रमेश धुमाळ, सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, सावनेर अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील सपोनि अनिल राऊत, सफौ गणेश राय, पोहवा माणिक शेरे, पोशि मिलींद मोरे, पियुष वाढीवे यांनी केली



