कत्तली करीता जनावरांची चोरी करणारी टोळी वाशिम गुन्हे शाखेच्या ताब्यात..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेने शिताफीने घेतले ताब्यात….

वाशिम (प्रतिनिधी) – आगामी बकरी ईदच्या निमित्त कटाईच्या उद्देशाने जनावरांची चोरी करणाऱ्या ३ अट्टल चोरट्यांना वाशिम पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील सर्व प्रकारचे अवैध धंदे व चोऱ्या करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यामध्ये विशेषतः शेती संबंधाने चोरी करणाऱ्याविरुध्द प्रभावी व कठोर कार्यवाहया करण्याच्या दृष्टीने गुन्हेगारीस आळा घालण्याकरीता सर्व ठाणेदारांना आदेशित केले.



तसेच बकरी ईद चे पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक अनुज तारे यांनी जिल्हयामध्ये होत असलेल्या चोऱ्या तसेच जनावर चोरीचे गुन्हे उघड करणे व गुन्हयांना आळा घालण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना दिले.वाशिम जिल्हयामध्ये जनावर चोरी करणारे गुन्हेगार सक्रीय असल्याने त्यांना पायबंध घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी जनावर चोरी करणारे गुन्हेगारांची गोपणीय माहिती काढली असता काळया रंगाचे फोर्ड इन्डेवर वाहन क्र.एम.एच.३१ सि.एन.७०६५ या वाहनामधील मागच्या सिट काढुन वाहनाला काळया फिल्म लावुन सदर वाहनामध्ये जनावरांना कोंबुन नेवुन त्यांची कत्तल करतात अशी माहिती मिळाल्याने सदर माहितीच्या आधारे अकोला जिल्हयातील महान येथे जावुन कसोशीने प्रयत्न करुन आरोपींचा शोध घेतला या मध्ये जनावर चोरी करणारे तिन आरोपींना ताब्यात घेण्यात आले १) अब्दुल मतिन अब्दुल नबी, (वय ३० वर्ष), रा.महान २) शेख अक्रम शेख मोहम्मद, (वय २२ वर्ष), रा.अकोट ३) शेख अलीम शेख महेमुद, (वय ४० वर्ष), रा.महान त्यांचे सोबत काळ्या रंगाचे फोर्ड इन्डेवर वाहन क्र.एम.एच.३१ सि.एन.७०६५ या वाहनामधील मागच्या सिट काढुन त्यामध्ये दोन गायी व एक वासरु कोंबुन होते. सदर दोन गायी व एक वासरु ची सुटका करुन वैद्यकीय तपासणी करुन गोरक्षण संस्थानचे आरक्षणात दिले आहे. नमुद तिन्ही आरोपींना वाहनासह ताब्यात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे आणुन विचारपुस केली असता त्यांनी वाशिम जिल्हयातील वाशिम, रिसोड, मालेगाव, जउळका, शेलुबाजार, मंगरुळपीर या भागातील जणावरे चोरुन नेले असल्याबाबत कबुली दिली आहे.



पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी जनतेस आवाहन केले की, वाशिम जिल्हयात अशा प्रकारच्या चोऱ्या करणारे, गुंडगिरी करणारे, अवैध धंदे करणाऱ्या इसमाविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल. अवैध हातभट्टी दारुवाल्यांविरुध्द प्रभावी धाडी व प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने गुन्हेगारीस आळा घालण्याकरीता सन २०२४ मध्ये एकुण ०८ जणांवर एम.पी.डी.ए.ची प्रभावी कारवाई करुन त्यांना जिल्हा कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. एम.पी.डी.ए. च्या एवढ्या मोठ्या प्रमाणात व प्रभावी कारवायामुळे नव्याने गुन्हेगार गुन्हे करण्यास धजावणार नाहीत. गुन्हेगारीस आळा बसेल या करीता प्रभावी कारवाया, धाडी पोलिस दलाकडून करण्यात येत आहेत. तेव्हा या पुढेही कार्यवाही सत्र असेच सुरु राहणार असल्याचा इशारा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी दिला आहे.





सदर कारवाई ही पोलिस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधिक्षक भारत तांगडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण महल्ले,सहा पोलिस निरीक्षक योगेश धोत्रे, पोहवा. विनोद सुर्वे, राजेश राठोड, आशिष बिडवे, नापोशि ज्ञानदेव म्हात्रे, पोशि अविनाश वाढे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!