नागपुर गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३० लाख रु किमतीचे MD पावडर सह ४ आरोपी घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

एम.डी. पावडर बाळगणाऱ्या ०४ आरोपींना गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करुन एकुण ३१,८०,५१०/- रू. चा मुद्देमाल केला जप्त….

नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१६).चे रात्री दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत, रहमानीया मस्जीद जवळ, महेंद्र नगर, पाचपावली, नागपूर येथे काही ईसम एम.डी. पावडर खरेदी-विक्री करीता येणार आहे.





अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून रहमानीया मस्जीद जवळ सापळा रचुन चार संशईत ईसम येतांना दिसताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी अनुक्रमे १) अझरूद्दीन रहीमुद्दीन काझी, वय ३७ वर्षे, रा. गल्ली नं. १६, घर नं. ६५५, महेंद्र नगर, पाचपावली, नागपुर २) ईरफान शब्बीर अहमद, वय २१ वर्षे, रा. टिमकी, मोमीनपुरा, तहसिल, नागपुर ३) नदिम खान नसिम खान, वय २४ वर्षे, रा. शांतीनगर घाट जवळ, नागपुर
४) सय्यद सोहेल अली उर्फ शोबु, वय २५ वर्षे, रा. नवि वस्ती, टेका, नागपुर यांना ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे जवळुन एकुण ३०६ ग्रॅम एम. डी. पावडर किंमत ३०,६०,००० /- रू. ची मिळुन आली तसेच त्यांचे ताब्यातुन एम.डी. पावडर, तीन मोबाईल फोन, एक स्प्लेंडर मोटारसायकल, वजन काटा व पाऊच असा एकुण ३१,८०,५१० /- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



आरोपी हे त्यांचे साथीदार पाहीजे आरोपी १) जुबेर अफसर शेख, रा. शिवडी, मुंबई २) सानु सलामुद्दीन काझी, रा. हैदरपुरा, अमरावती, ह.मु.- शांतीनगर, नागपुर ३) शेख अतीक, रा. शांतीनगर घाट जवळ, नागपुर यांचे मदतीने अवैध अंमली पदार्थ खरेदी विक्री करीत असल्याचे सांगीतले यावरुन आरोपींचे कृत्य हे कलम ८ (क), २२ (क) २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने,  सर्व आरोपीविरुध्द पोलिस ठाणे पाचपावली येथे गुन्हा नोंदविण्यात आला असुन यात. चार आरोपींना अटक करण्यात आली असुन एका आरोपीचा शोध सुरु आहे तसेच आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव पाचपावली पोलिसांचे ताब्यात देण्यात आले. आहे



सदरची कामगिरी  पोलीस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल,सह पोलिस आयुक्त अस्वती दोरजे,अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील,पोलिस उप आयुक्त (डिटेक्शन) निमीत गोयल,सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे)अभिजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोनि. गजानन गुल्हाने, सपोनि. मनोज घुरडे, सफौ. सिध्दार्थ पाटील, पोहवा.विवेक अढाऊ, मनोज नेवारे, सुरज भानावत, शैलेष दोबोले, नापोअं. पवन गजभिये, राशिद शेख, पोअं. रोहीत काळे,सहदेव चिखले, सुभाष गजभिये, शेषराव रेवतकर व मपोहवा. अनुप यादव यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!