
स्वतःच्या बायकोवर सामुहीक बलात्कार करुन व्हिडीयो केली अपलोड
मुंबई – स्वतःच्या बायकोवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ अपलोड केल्याची महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना मुंबईच्या ट्रॉम्बे परिसरात समोर आलेली असून एका चाळीस वर्षीय व्यक्तीने त्याच्या दोन मुलांसोबत मिळून 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग काढत चक्क पॉर्न साईटवर अपलोड केले. अत्याचार झालेली महिला ही आरोपीची सावत्र बायको असून आरोपीने आधीच्या पत्नीच्या
दोन मुलांसोबत हे कृत्य केलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिलेचा 2010 मध्ये पहिल्या पतीसोबत घटस्फोट झालेला होता त्यानंतर 2015 मध्ये तिची
आरोपीसोबत ओळख झाली आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. चिता कॅम्प ट्रॉम्बे इथे ते राहत असून महिलेला पहिल्या लग्नापासून आठ आणि दहा वर्षाची दोन मुले आहेत. कोरोना काळात आरोपीचा त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला. त्याला वीस आणि बावीस वर्षाची दोन मुले असून दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर आरोपी तक्रारदार महिलेसोबत राहायला लागलेला होता. 22 जून रोजी त्याने महिलेला दारू पाजली त्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर आरोपी हा त्याच्या मुलांसोबत तिच्यावर बलात्कार करू लागला. प्रकरण इतक्यावर थांबले नाही तर आरोपीने चक्क हा सर्व प्रकार
मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली त्यावेळी त्याच्या फोनमध्ये पत्नीचे असे व्हिडिओ आढळून आलेले आहेत.
पोलिस उपनिरीक्षक शरद नाणेकर यांनी याप्रकरणी बोलताना,
‘घटना घडल्यानंतर तिघेही फरार होते मात्र त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली असून आरोपीच्या फोनमध्ये पोलिसांना त्याच्या पत्नीचे सुमारे 700 पॉर्न व्हिडिओ सापडलेले आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने हे व्हिडिओ दोन पॉर्न वेबसाईटवर देखील आपण अपलोड केलेले आहेत याची देखील कबुली दिलेली आहे, पुढील तपास पोलिस करीत आहेत


