
अकोला शहरातील विविध दुकानातील चोरी प्रकरणी उत्तरप्रदेश येथील टोळीस गुन्हे शाखेने केले गजाआड….
अकोला शहरातील पोलिस स्टेशन सिव्हील लाईन,रामदासपेठ हद्दीत रेडीमेड कापड दुकानांचे शटर वाकवुन चोरी करणारी उत्तर प्रदेश येथील स्थानिक गुन्हे शाखेने केली टोळी गजाआड…..
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीत दि(१६) जुलै २०२४ रोजी रात्री दरम्यान नेकलेस रोड वरील तायवा कलेक्शन व जे. जे अॅनेक्स या कापड दुकानाचे शटर वाकवुन तसेच श्री. बालाजी ॲटोमोबाईल स्पेअर पार्ट दुकान व जठारपेट चौकातील वैशाली ड्रायफुट चे दुकान व आनंद झेरॉक्स सेंटर या दुकानाचे अज्ञात चोरटयांनी शटर वाकवुन दुकानातील मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेली होती.


त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन सिव्हील लाईन व रामदासपेठ अकोला येथे अज्ञात आरोपी विरूध्द ०३ चोरीचे गुन्हे नोंद करण्यात आले होते.गुन्हा घडल्यावर विविध घटनास्थळावरून सि. सि. टी. व्ही फुटेज मध्ये संशयीत आरोपीचे चेहरे स्पष्ट होते. त्यांची ओळख
पटवुन गुन्हे उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसापुढे होते त्यानुसार सदरील फोटो राज्यात तसेच ईतर राज्यात प्रसिध्द करून गोपनिय माहीती व तांत्रिक विश्लेषनावर आरोपीचा सहभाग निष्पन्न
झाला होता.व स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने भुसावळ पर्यत पाठलाग केला होता. रात्री उशीरा स्था. गु.शा. अकोला यांना आरोपी हे उत्तर प्रदेश असुन त्यांचे १) मोहम्मद राशीद उर्फ गब्बरू मोहम्मद मुशाहीद, रा. शहाजमाल, किशोर ता.मवाना जि.मेरठ, (उत्तर प्रदेश ) २) मोहम्मद सलमान मोहम्मद शोकीन रा.शाहाजमाल, ता. मवाना जि. मेरठ, (उत्तर प्रदेश), ३)मोहम्मद नदिम मोहम्मद बुदुखॉ रा. मसुरी ता. जि. गाजियाबाद ४) मोहम्मद नदिम मोहम्मद कल्लु रा. मसुरी ता.जि.गाजियाबाद (उत्तर प्रदेश) हे असल्याचे निष्पन्न झाले.

सदर पथक भुसावळ वरून परत येत असतांना तेच आरोपी लातुर लातुर येथे असल्याची माहीती मिळाली तरी लातुर येथे तात्काळ पोहचणे शक्य नसल्याने स्थानिक गुन्हे शाखा अकोला चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखा, लातुर यांचे सोबत संर्पक साधुन आरोपी कोठे थांबले आहेत या बाबत सर्व माहीती दिली होती. लातूर, येथे गुन्हा करण्यापुर्वीच स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखा, लातुर यांनी नमुद आरोपी यांना ताब्यात घेतले. अकोला पोलिसांना याबाबत माहीती मिळाल्याने सदर आरोपी हे भारतभर मुख्य शहरात मध्ये अशा प्रकारे गुन्हे करणार होते म्हनुन होणा-या गुन्हयाला प्रतिबंध बसुन आरोपी जेरबंद करण्यात आले.

सदर तिन्ही आरोपींची चौकशी केली असता आरोपींनी अकोला येथील तायबा कलेक्शन सह ईतर दुकानांचे शटर वाकवुन चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा,अकोला येथील पो.उप.नि. आशिष शिंदे व ०८ अमंलदार यांनी सदर आरोपी लातुर न्यायालयाचे परवानगी ने अटक करून अकोला येथे पुढील कार्यवाही करीता घेवुन आले
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक, अभय डोंगरे यांचे मार्गदर्शना खाली पो. नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला व पोउपनि आशिष शिंदे, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस अंमलदार, सुलतान पठान, वसिमोद्दीन, आकाश मानकर, लिलाधर खंडारे, अभिषेक पाठक, स्वप्निल चौधरी, मोहम्मद आमीर, सतिश पवार, विजय कबले तसेच सायबर सेल चे अंमलदार आशिष आमले यांनी पार पाडली.


