
तिवसा येथील जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…
तिवसा येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,८ जुगारीसह २.४९ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त….
तिवसा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात चालत असलेल्या ताश पत्याच्या जुगार खेळ खेळणाऱ्यांवर कारवाई करणेबाबत आदेशित केल्यावरुन पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा.यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन आवश्यक सुचना दिल्या होत्या.


त्या अनुषगांने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गोपनिय माहीती घेत असतांना दि.१७/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहीती मिळाली कि, ग्राम तिवसा येथील कुऱ्हा ते तिवसा रोडवरील रणथंबीर कॉलनी मध्ये एका बंद घरामध्ये काही ईसम हे ५२ ताश पत्यावर हारजीतचा जुगार खेळ खेळत आहे.

अशा माहितीवरुन स्था.गु.शा.चे पथकाने मिळालेल्या खबरेप्रमाणे जावून छापा कार्यवाही केली असता १) सुदर्शन सदाशिव विघ्ने वय ३८ वर्ष, रा. तिवसा २) विनोद पंजाबराव तायडे वय ५० वर्ष, रा. तिवसा ३) मुरलीधर अर्जुन मेश्राम वय ५० वर्ष, रा. तिवसा ४) जितेश सुरेश डांगरकर वय ३० वर्ष, रा. सुरवाडी तिवसा ५) सुमीत अनिलराव सोनोने वय २८ वर्ष, रा. सातारगाव ६) विकास सुभाषराव ठाकरे वय ४० वर्ष, रा. सुरवाडी तिवसा ७) सचिन धनसिंग मय्यर वय ४४ वर्ष, रा. शेंदुरजना बाजार, तिवसा ८) शुभम सुरेश लोरे वय ३० वर्ष, रा. तिवसा असे लोकांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातुन एकुण नगदी ६९,६९०/-रु, ५२ ताश पत्ते, मोटर सायकल व मोबाईलसह कि. अं. १,८०,०००/- असा एकूण २,४९,८१०/-रु चा मुदेमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी व मुदेमाल पोलिस स्टेशन तिवसा यांचे ताब्यात देण्यात आला.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे नेतृत्वात पोउपनि सागर हटवार, पोलिस अंमलदार मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, चालक संजय प्रधान यांनी केली.


