अट्टल वाहन चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने वाहने चोरणारी टोळी ताब्यात घेऊन १४ मोटारसायकल व ०६ अॅटो रिक्षा केल्या जप्त….

जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी जळगांव जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असुन तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार जळगांव शहर पोलिस स्टेशन CCTNS NO १९५/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे चोरीस गेलेली मोटार सायकल पाळधी ता धरणगाव येथील एका इसमाने चोरी करुन वापरत असल्याची गोपनीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, नापोशि प्रविण भालेराव, पोशि सागर पाटील यांना मिळाली होती.





सदरची माहिती ही वरीष्छ पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बबन आव्हाड  यांना कळवुन त्यांनी पोउपनि दत्तात्रय पोटे, श्रेणी पोउनि  श्रीकृष्ण पटवर्धन, पोहवा संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, नापोशि प्रविण भालेराव, सागर पाटील,पोहवा संदिप पाटील, जयवंत चौधरी,पोशि प्रदिप चवरे,पोशि ईश्वर पाटील, लोकेश माळी, चापोहवा दिपक चौधरी, चापोहवा भारत पाटील यांचे पथक तयार करुन गोपनीय माहीतीची खात्री करुन मोटार सायकल चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेवुन पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.



त्यावरुन सदर पथक नमुद पथक हे पाळधी गावात जावून मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे मोटार सायकल चोरीकरणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता गावातील शनि नगर स्टेशन रोड भागात संशयास्पद रित्या मिळुन आल्याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्याने व त्याचे दोन साथीदारांनी मिळून दोन वर्षापुर्वी जळगांव शहरातुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगीतले. त्याचे नांव १) मुस्तकीन अजीज पटेल वय-२८ रा शनिनगर देढ गल्ली पाळधी ता धरणगांव व उर्वरीत २) आमीन कालु मनियार वय-३९ रा रंगारी मोहल्ला पाळधी ३) जावीर सलामत शेख वय-२७ रा इदगांह प्लाट पाळधी, असे सांगीतल्याने पोलिस पथकाने त्यांनाही ताब्यात घेतले त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी जळगांव, मालेगांव, छत्रपती संभाजी नगर, खारघर नवी मुंबई, जुहू मुंबई बारडोली (गुजरात) या तसेच इतर शहरातुन महागड्या मोटार सायकल व अॅटो रिक्षा चोरी करुन वेगवेळ्या इसमाना विक्री केल्याचे सांगीतले म्हणुन त्यांनी दिलेल्या माहीतीवरुन पोलिस पथकाने एकुण १४ महागड्या मोटार सायकल व ६ अॅटो रिक्षा एकुण किमंत २२,४०,०००/- रुपयाचे जप्त केल्या. तरी १) मुस्तीन अजीज पटेल वय-२८ रा शनिनगर देढ गल्ली पाळधी ता धरणगांव, २) आमीन कालु मनियार वय-३९ रा रंगारी मोहल्ला पाळधी, ३) जाबीर सलामत शेख वय-२७ रा इदगांह प्लाट पाळधी, यांना जळगांव शहर पोलीसस्टेशन गुरनं १९५/२०२२ भादवि कलम ३७९ च्या तपासाच्या अनुषंगाने जळगांव शहर पोलिस स्टेशन यांचे ताब्यात दिनांक १६/०८/२०२४ रोजी देण्यात आले असून सद्या आरोपी न्यायालयीन कोठडी मध्ये आहेत.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी,अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव कविता नेरकर,उपविभागिय पोलिस अधिकारी,जळगाव संदिप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांचे नेतृत्वात पोउपनि दत्तात्रय पोटे, श्रेणी पोउनि  श्रीकृष्ण पटवर्धन, पोहवा संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, नापोशि प्रविण भालेराव, सागर पाटील,पोहवा संदिप पाटील, जयवंत चौधरी,पोशि प्रदिप चवरे,पोशि ईश्वर पाटील, लोकेश माळी, चापोहवा दिपक चौधरी, चापोहवा भारत पाटील यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!