
स्थानिक गुन्हे शाखेने पेट्रोलिंग दरम्यान समुद्रपुर हद्दीत MD पावडर बाळगणारे यांना घेतले ताब्यात….
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समुद्रपूर हद्दीत अंमली पदार्थ MD पावडर बाळगणारे घेतले ताब्यात , 2 मोबाईल व चारचाकी वाहनासह एकूण . 5,57,760/- रु. चा मुद्देमाल केला जप्त….
वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(1) सप्टेंबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेची पथके पोलिस स्टेशन समुद्रपूर परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करने करीता पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरद्वारे गोपनीय माहिती मिळाली की, नागपूर वरून हिंगणघाट कडे एक ईसम एका चारचाकी वाहन क्र. एम.एच. 32 ए.एच. 6887 या वाहनाने MD (मॅफेड्रॉन ) अंमली पदार्थाची वाहतूक करून घेऊन येत आहे. अशा माहिती वरून पोलिस स्टेशन समुद्रपूर हद्दीत शेडगांव फाटा येथे नाकाबंदी करून सदर वाहन येतांना दिसताच त्यास थांबवुन चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) यशवंत जगदीश सहारे, वय 27 वर्ष, रा. काजीवार्ड हिंगणघाट तसेच त्याचे सोबत असलेली त्याची सहकारी मैत्रीण 2) कु. वैष्णवी वसंतराव घोडमारे, वय 27 वर्ष, रा. न्यू यशवंतनगर हिंगणघाट असे सांगितले


सदर ईसमाची त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन 1) 9 ग्राम 44 मिलिग्रँम वजनाची MD (मॅफेड्रॉन)पावडर किंमत 37,760/-₹.2) दोन अँड्रॉइड मोबाईल किंमत 20,000/-रू, 3) एक मारुती सुझुकी स्विफ्ट कंपनीची कार जिचा क्रमांक एम.एच. 32 एम.एच. 6887 किंमत 5,00,000/-
असा एकूण किंमत 5,57,760/-रुपये चा मुद्देमाल मिळून आला पंचांसमक्ष जप्त करण्यात आला. आरोपींनी सदरची MD ( मॅफेड्रॉन पावडर कुठून आणली याबाबत विचारणा केली असता त्यांनी आरोपी क्रमांक 3) मंगेश गोपाल भोंगडे, वय 31 वर्ष, रा मीठा उमरी तह. हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडून खरेदी करून आणल्याचे सांगितल्याने त्यासही हिंगणा जिल्हा नागपूर येथून ताब्यात घेऊन तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस स्टेशन समुद्रपूर हे करीत आहे..

सदर कारवाई पोलिस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधिक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा विनोद चौधरी यांचे मार्गदर्शनात पो. उप. निरिक्षक व पोलीस अंमलदार हमीद शेख, संतोष दरगुडे, चंद्रकांत बुरंगे, सचिन इंगोले, श्रीकांत खडसे, राजेश तिवसकर, प्रमोद पिसे, रामकीसन इप्पर, धर्मेंद्र अकाली, विकास मुंढे, अरविंद इंगोले, उदय सोलंकी, अखिल इंगळे, रितेश गेटमे, गोविंद मुंढे महिला अंमलदार निलीमा कोहळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली



