
मटका अड्ड्यावर धाड,दोन आरोपींसह पोलिस शिपायावर गुन्हा दाखल…
मटका अड्ड्यावर नुतन पोलिस उपायुक्त रश्मिता राव यांचा छापा, २ आरोपींसह पोलिस शिपायावर गुन्हा दाखल…
नागपूर शहर (प्रतिनिधी) – सट्टापट्टीवर लोकांकडून पैसे घेऊन खायवाडी करणाऱ्यावर आणि त्या सोबतच त्यांच्यासोबत लागेबांधे ठेऊन स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणाऱ्या पोलिस शिपायावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १) मंगेश संभाजी बावणे, (वय ४० वर्षे), रा.प्लॉट नं.१२९, शाम पान ठेल्याचे बाजुला, शंकरपूर, पो.ठाणे बेलतरोडी, नागपूर, २) मनिष माताप्रसाद प्रजापती, (वय २६ वर्षे) रा.शेषनगर, पो.ठाणे हुडकेश्वर, नागपूर ३) पोशि. मनोहर काशीनाथ मुलमुले, (वय ४२ वर्षे) नेमणूक पोलीस ठाणे अजनी, नागपूर शहर यांच्यावर पोलिस उपनिरीक्षक सुशांत उपाध्ये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजनी पोलीस ठाण्यात ४९३/२०२४ कलम १२(अ), महा.जु.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मंगेश आणि मनीष हे दोघेही सट्टाअड्डा चालवित असल्याची गोपनीय माहिती नवनियुक्त पोलीस उपायुक्त रश्मीथा राव यांना मिळाली. त्यांनी लागलीच एक पथक तयार करून धाड मारली. पोलीस पथकाने आरोपींच्या अड्ड्यावर झाडाझडती घेतली असता, यावेळी आरोपी स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता सट्टापट्टीवर लोकांकडून पैसे स्वीकारून खायवाडी करीत असल्याचे मिळून आले.


याबाबत अधिक माहिती अशी की, नुतन पोलिस उपायुक्त परीमंडळ ४ रश्मीता राव यांचे माहिती वरून श्रीक्रुष्ण डेअरी ॲन्ड जनरल स्टोअर्स,पार्वती नगर गल्ली नं ५,रामेश्वरी रिंग रोड येथे संध्या ५.३० ते ६.३० वा चे दरम्यान स्टाफ व दोन पंचासमक्ष कारवाई केली असता, यातील नमुद ठिकाणी यातील पहिला आरोपी मंगेश संभाजी बावणे आणि दुसरा आरोपी मनिष माताप्रसाद प्रजापती हा स्वतःच्या आर्थीक फायदयाकरीता कल्याण मुंबई नावाचे सट्टापट्टीवर लोकांकडून पैसे स्विकारून खायवाडी करत असताना मिळुन आला.

नमुद दोन्ही आरोपीचे अंगझडतीत घटनास्थळाहून पहिल्या आरोपीकडून सट्टापट्टी लिहीलेल्या चिठ्ठ्या व त्याने तिथेच बाजुला ठेवलेले कल्याण सट्टापट्टीचे आकडे लिहीलेल्या कागदी २५१ थिटोरे काढून दिले. तसेच रोख रक्कम ४५०/- रू. ओप्पो कंपनीचा मोबाईल किं.१००००/-, १ निळया शाईचा बॉलपेन किं.१० रू. १ लाल शाईमा पेन किं.१०/- रू. तसेच दुसरा आरोपी मनिष माताप्रसाद प्रजापती याच्याकडे १७०/- रू. रोख रक्कम व वन प्लस कंपनीचा मोबाईल किं.१५०००/- असा एकूण मुद्देमाल २५६४०/- रू. हा मिळुन आल्याने तो जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करण्यात आला. मात्र जेव्हा यातील मंगेश बावणे याचा मोबाईल फोन चेक केला असता त्यामध्ये अजनी पोलिस ठाणे येथे नेमणुकीस असणारे पोशि.मनोहर मुलमुले यांना (दि.१०सप्टेंबर) रोजी बिट मार्शल ०३ मध्ये बिट मार्शल डयुटी असताना अवैध धंद्यावर कारवाई करणे तसेच सीएफएस कॉल अटेंड करून कायदा व सुव्यवस्था राखणे हे कर्तव्य असताना पहिला आरोपीचे ऑनलाईन ट्रांजेक्शन व कल्याण सट्टापट्टीचे आकडे लिहिलेले चिटोरिचे फोटो दिसुन आल्याने तिसरा आरोपी पोलिस शिपाई मनोहर मुलमुले हा स्वतः आर्थिक फायदयाकरीता आरोपी कडे सट्ट्याचे आकडे लगवाडी करीत असतांना दिसून आल्याने यातील तिन्ही आरोपींचे हे कृत्य कलम १२ (अ) म.जुका प्रमाणे होत असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना नमुद गुन्हयात सुचना पत्र देवून सोडण्यात आले.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार सिंघल सहपोलिस आयुक्त निसार तांबोळी,अपर पोलिस आयुक्त शिवाजीराव राठोड,पोलिस उपायुक्त परीमंडळ ४ रश्मिता राव, यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे अजनी चे वपोनि नितीनचंद्र राजकुमार, पो.उप नि. सुशांत उपाध्ये, पो.अंमलदार चेतन एडके यांनी केली आहे. तेव्हा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, पोलीस ठाणे अजनी हद्दीत कोणतेही अवैध धंदे चालत असल्यास पोलिस ठाण्यास कळवावे


