बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकिय रुग्णालयात बोगस औषधांचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा गोरखधंदा नागपुर ग्रामीण पोलिसांनी केला उघड,तपासअंती अनेक खुलासे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

 महाराष्ट्रासह ईतर राज्यात शासकीय रूग्णालयांमध्ये खोटे कागदपत्रे सादर करून बनावट औषधींचा साठा वितरीत करणाऱ्या आतंरराज्यीय टोळीचा सहा.पोलिस अधिक्षक,अनिल मस्के यांनी केला पर्दाफाश, ६आरोपींना केले जेरबंद…

सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील रूग्णालयांमध्ये महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, उत्तराखंड येथील आंतराज्यीय टोळीतील काही ईसमांनी खोटे कागदपत्रे सादर करून बनावट औषधींचा साठा वितरीत केल्याची घटना उघडकीस आली असून या आंतराज्यीय टोळीने सन २०२१ पासून ते आतापावेतो महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील रूग्णालयांमध्ये बनावट औषधी वितरीत केल्या आहेत. सन २०२२ मध्ये ठाणे जिल्हयातील इंदिरा गांधी मेमोरिअल हॉस्पीटल भिवंडी येथील औषध भांडार येथे आरोपींनी वितरीत केलेल्या Formox 250 या बनावट औषधीचा नमुना सापडला होता त्यावरून पो.स्टे. शांतीनगर ठाणे शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेथे टोळीतील मुख्य आरोपी विजय शैलेन्द्र चौधरी, रा. मिरा रोड ठाणे याने बनावट औषधी कानपुर उत्तरप्रदेश येथुन खरेदी केल्याबाबतची बिले सादर करून पोलीसांची दिशाभूल केली होती.





त्याचप्रमाणे फेब्रुवारी २०२३ मध्ये नागपुर जिल्हयातील ग्रामीण रूग्णालय कळमेश्वर येथुन औषध निरीक्षक श्री नितीन भांडारकर यांनी Recip 500 (Ciprofloxacin) या औषधीचा नमुना घेवुन प्रयोगशाळेत परिक्षणासाठी पाठविला. परीक्षणाचा अहवाल आल्यावर त्यांना समजले कि सदरची औषधे ही यातील आरोपी क्र नामे १) हेमंत धोंडीबा मुळे वय ४२ वर्ष कव्वा रोड, लातुर यांचे मालकीचे मे. जया इंटरप्रायजेस लातुर यांचे कडुन जिल्हा शल्य चिकीत्सक नागपुर औषध भंडार येथे पुरवठा झाला. आरोपी क्र १ हेमंत धोंडीबा मुळे यांनी सदर बनावट औषधी आरोपी क्र २) मिहीर शशिकांत त्रिवेदी वय ३८ वर्ष रा भिवंडी यांचे कडुन मागविली होती. आरोपी क्र २ मिहीर शशिकांत त्रिवेदी यांनी सदर औषधी ही विजय शैलेद्र चौधरी वय ३२ वर्ष रा मीरा रोड ठाणे यांच्या मालकीच्या मे. काबीज जनरीक हाउस मिरा रोड ठाणे यांचेकडुन खरेदी केल्याचे चौकशीत दिसुन आले. सदर बनावट औषधीचे उत्पादनाबाबत तपास होणेसाठी त्यांनी पोलिस स्टेशन कळमेश्वर जिल्हा नागपुर ग्रामीण येथे दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्र. ५७/२०२४ कलम ४२०,४६७,४६८,४७१,२७४,२७५,२७६,१२०(ब), ३४ भादवि चा नोंद करण्यात आला होता व पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचे आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांचेकडे देण्यात आला होता.



सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान असे निर्देशनास आले कि अनुक्रमे आरोपी क्र १) हेमंत धोंडीबा मुळे २) आरोपी क्र २)मिहीर शशिकांत त्रिवेदी आरोपी क्र ३) विजय शैलेद्र चौधरी यांनी सदर बनावट औषधी ही लाडवा हरियाणा येथिल के.पी. मेडीकल एजन्सी याचेकडुन खरेदी केली असुन त्याबाबतचे बील सादर करून मा. सत्र न्यायालय, मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर येथुन अटकपूर्व जामीन मिळविला होता परंतु सदर गुन्हयाचे तपास अधिकारी सहा पोलिस अधिक्षक अनिल म्हस्के  यांनी त्यांचे तपास पथक हरीयाणा येथे पाठविले असता के पी मेडीकल एजंसी हे अस्तित्वात नसल्याबाबत समजले. सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी यांनी तपासादरम्यान मिळविलेले पुरावे मा. सत्र न्यायालय व उच्च न्यायालय यांना सादर करून आरोपीचा अटकपूर्व जामीन नामंजुर करून घेतला.तसेच नमुद आरोपींना अटक करून त्याचा पी.सी.आर. घेण्यात आला चौकशी दरम्यान आरोपी क्र १ ते ३ यांनी सदर बनावट औषधी ही सहारनपुर उत्तरप्रदेश येथील आरोपी क्र ४) रॉबीन उर्फ हिमांशु विजयकुमार तनेजा व ५) रमन विजयकुमार तनेजा या दोन्ही भावांकडुन खरेदी केले असल्याचे सांगितले. त्या दोघांनाही अटक करण्यात आली व तपासादरम्यान असे निर्दर्शनास आले कि सदर बनावट औषधी ही द्वारिका नॅचरल फॉम्र्युलेशन चा मालक आरोपी क्र ६) अमीतकुमार सुरेशचंद धिमान याचेकडुन खरेदी केली. अमीतकुमार धिमान यांचे कडे जनावरांचे औषधी बनविण्याची फॅक्ट्री असुन याच फॅक्ट्री मध्ये आरोपीने मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या बनावटी औषधी तयार केल्याचे समजले. त्यालासुध्दा तपासादरम्यान अटक करण्यात आलेली आहे



तसेच पुढे सदर गुन्हयाचे तपासात आरोपींनी Ciprofloxacin, Livofloxacin, Amoxyllin, Cefixime, Azithromycin अशा औषधी वेगवेगळ्या नावाने तयार करून त्याबाबत SUPER TECH MEDI LAB, EVERTOUCH BIO REMEDIES, ONE TOUCH BIO SCIENCE अशा अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांचे प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र व M/s Steffan Formulation, M/s Refant Pharma Pvt. Ltd., M/s Marine Hydrocolloids, M/S Ginx Pharmakon LLP अशा अस्तीत्वात नसलेल्या उत्पादक कंपन्यांच्या नावाने आणखी बनावट औषधी तयार करून स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी या बनावट औषधींच्या सेवनाने लोकांचा मृत्यु होवु शकतो हे माहीत असुनही त्या बाजारात उपलब्ध करून शासनाची व जनतेची फसवणुक केली असल्याचे निष्पन्न झाले असुन आरोपींचे बँक अकाउंटचे स्टेटमेंटवरून अंदाजे १५ ते १६ कोटी रूपयांची उलाढाल असल्याचे दिसुन येत आहे. आरोपीने यांनी सर्व पैसा हवाला यांचे अंगडीया यांचे मार्फतीने महाराष्ट्रातुन, मुंबईत, आणि सहारनपुर असा नेला आहे. आरोपींनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी आणि इतर राज्यातही अशी बनावट औषधी पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर आरोपींनी औषध खरेदी विक्री करण्याकरीता लागणारे फार्मासीटीकल प्रमाणपत्र G.M.C.C. आणि C.O.A यांचे सुध्दा बनावटीकरण करून खोटे प्रमाणपत्र तयार केले. तसेच के पी मेडीकलचे बील सुध्दा खोटे तयार करण्यात आले होते.

महत्वाची बाब म्हणजे सहा पोलिस अधिक्षक अनिल म्हस्के (I.P.S.)  यांनी तसेच त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ज्या ठिकाणी बनावट औषध तयार केली गेली तिथपर्यंत पोहचुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या व गुन्हा उघडकीस आणला असल्याने ईतरही जिल्हयातील गुन्हे उघडकीस आलेले आहेत. गुन्हयाचा आणखी तपास सुरू असुन गुन्हयातील आरोपींनी बनावट औषधी झारखंड, हरियाणा या राज्यात सुध्दा विक्री केले असल्याची माहीती आहे व पुढील तपासामध्ये आणखी काही धागेदोरे बाहेर येण्याची शक्यता आहे. दिनांक २०.०९.२०२४ सदर गुन्हयामध्ये एकुण ०६ आरोपी नामे १) हेमंत धोंडीबा मुळे वय ४२ वर्ष रा कव्वा रोड, लातुर २) मिहीर शशिकांत त्रिवेदी वय ३८ वर्ष रा टेमघर भिवंडी ३) विजय शैलेद्र चौधरी वय ३२ वर्ष रा मीरा रोड ठाणे, ४) रमन विजयकुमार तनेजा वय ३६ वर्ष रा जनता रोड सहारनपुर, ५) रॉबिन उर्फ हीमांशु विजयकुमार तनेजा वय ३६ वर्ष जनता रोड सहारनपुर ६) अमित सुरेचंद्र धिमान वय ३६ वर्ष रा मतलबपुर पोलीस ठाणे गंगनहर, रूडकी जि हरीद्वार उत्तराखंड यांचे विरूध्द दोषारोप मा. न्यायालयात दाखल केले असुन सदर गुन्हयाचा तपास संपलेला नसुन अधिक पुरावे दाखल करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के,पोलिस उपनिरीक्षक कोलते, पोलिस हवालदार सतिश राठोड, पोलिस अंमलदार नितेश पुसाम, मनिष सोनवणे यांनी पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!