
राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी व डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचे सदस्य गोंदिया पोलिसांचे जाळ्यात सापडले….
राष्ट्रीय महामार्ग क्र ५३ वर रायपूर ते नागपूर वर नैनपुर ते कोहमारा येथे ट्रक चालकास धमकावून ट्रक मधील डिझेल चोरी करणारे व जबरीने लुटणारी आंतराज्यिय टोळीतील दोन अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,गुन्ह्यांत वापरलेल्या दोन चारचाकी वाहनासह डीझेल विक्रीचे पैसे व इतर साहित्य असा एकूण किंमती 56,14,900/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त….
गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी श्री. प्रदिप मोतीलाल यादव वय 36 वर्ष रा. चकनायक जादावावर देवारा जादीद किटा पोलीस स्टेशन महाराज गंज ता. सागरी जि. आजमगड, राज्य – उत्तप्रदेश याने दि(24) सप्टेंबर 2024 रोजी पोलिस स्टेशन डुग्गीपार येथे तक्रार दिली की तो भारत बेंझ कंपनीचा ट्रक क्र. एम.एच 40 /एके- 2557 चा चालक असून गडचिरोली जिल्हयातील सुरजागड पहाडी वरून आयरन मिट्टी रायपूर जवळ जय बजरंग इस्पात फॅक्टरी मध्ये घेऊन जात असताना दिनांक 24/09/2024 चे रात्री 01.40 वाजता चे सुमारास फिर्यादि हा आपल्या ताब्यातील ट्रक ने सुरजागड पहाडी गडचिरोली येथून आयरन मिट्टी रायपूर येथे घेउन जात असतांना नॅशनल हायवे 53 आराध्या पेट्रोल पंप जवळ नैनपूर येथे थांबला असताना 20 ते 25 वर्षे वयोगटातील 4 अनोळखी आरोपीनी पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीने ट्रक जवळ येवुन त्यातील एक आरोपी हा ट्रकवर चढुन फिर्यादी व चालक प्रदिप मोतीलाल यादव यास धमकावून शिवीगाळ करून व इतर आरोपी यांनी ट्रक मधुन अंदाजे 175 लिटर डिझेल किंमत 16,100/-रू.चा जबरीने चोरून नेले अशा फिर्यादीचे रिर्पाटवरून पो. ठाणे डूग्गीपार येथे अप क्र. 345/2024 कलम 309(4), 3(5) भा.न्या. संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता


सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक गोंदिया गोरख भामरे यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ अटक करून गुन्हा उघड करण्याचे निर्देश ठाणेदार पोलिस स्टेशन डुग्गीपार पोलिस निरीक्षक मंगेश काळे तसेच पोलिस निरीक्षक स्थागुशा दिनेश लबडे यांना दिले होते. डुग्गीपार पोलीसांतर्फे तसेच पो.नि. स्थागुशा यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातर्फे गुन्ह्याचा समांतर तपास करण्यात येत होता त्यानुसार स्थागुशा चे पोलीस पथक गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध, व गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाने फिर्यादी यांनी आरोपीचे सांगितलेले वर्णन, गोपनीय बातमीदाराने दिलेली माहिती तसेच गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत व गुन्हेगारांचे तांत्रीक विश्लेषण या माहितीच्या आधारे महामार्गावर ट्रक चालकांना धमकावून डिझेल चोरी करणारे अट्टल गुन्हेगार 1) हिमांशु ऊर्फ पुटटु राजकुमार विश्वकर्मा वय 19 वर्ष रा. वार्ड नं. 15, खेरमाई मोहल्ला, नैनपुर, जि. मंडला, (म.प्र.),2) सलमान बशीर खान वय 27 वर्ष. रा. राजीव कॉलोनी, देवदरा, मंडला, (म.प्र) यांना नैनपुर जिल्हा- मंडला ( मध्यप्रदेश) येथून जेरबंद करून ताब्यात घेण्यात आले

दोघांनाही गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपूस केली असता दोघांनीही त्यांचे ईतर 5 साथीदार यांचेसह मिळुन गुन्हा केल्याचे कबूल केले दोन्ही आरोपींचे ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या दोन इनोव्हा चारचाकी गाड्या व डीझेल विक्रीचे पैसे, व इतर साहित्य असा एकूण किंमती 56,14,900/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील ईतर साथीदारांचा शोध सुरु आहे तसेच जेरबंद करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपास कामी पोलिस स्टेशन डूग्गीपार यांचे स्वाधीन करण्यात आले आहे.दोन्ही जेरबंद कऱण्यात आलेले आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून यांच्यावर ईतर जिल्ह्यात राज्यात, जबरी चोरी, दरोडा यासारखे गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील तपास कायदेशीर कारवाई डूग्गीपार पोलीस करीत आहेत

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांचे आदेशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी, देवरी विवेक पाटील यांचे मार्गदर्शनात स्थागुशा चे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोलिस पथकातील पो.उप.नि शरद सैदाने, पोलीस अंमलदार तुलसीदास लुटे, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, हंसराज भांडारकर, घनश्याम कुंभलवार यांनी अथक परिश्रम प्रयत्नांनी गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना जेरबंद करून कामगिरी केली आहे.


