
खामगाव ग्रामीण पोलिसांनी ट्रक चोरीचा गुन्हा काही तासाचे आत केला उघड…
ट्रक चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी खामगाव पोलिसांच्या ताब्यात…
बुलडाणा (प्रतिनिधी) : खामगाव ग्रामीण पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास आणि मिळालेल्या गोपनीय खात्रीलायक माहितीच्या आधारावर एका चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी अब्दुल एजाज अब्दुल समद, (वय 42 वर्षे), रा. बाळापूर, जि. अकोला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गु. र. नं.449/2024 कलम 303(2) भा. न्या. सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील फिर्यादी अब्दुल एजाज अब्दुल समद रा बाळापुर अकोला यांनी पोलिस स्टेशन. खामगाव ग्रामीण येथे रिपोर्ट दिला की, तो चालवत असलेला ट्रक क्रमांक MH 30 L 4684 किंमत 5,50,000/- रुपये (दि.7नोव्हेंबर) रोजी दुपारी 2.30 वा.चे सुमारास विजयलक्ष्मी पेट्रोलपंप समोर उभा करुन बाळापुर येथे गेले व (दि.10नोव्हेंबर) रोजी संध्याकाळी 5.40 वा.विजयलक्ष्मी पेट्रोलपंप जवळील ट्रक जवळ आले असता सदर ठिकाणी ट्रक दिसुन आला नाही. त्यावरुन ट्रान्सपोर्ट मालक व इतरांना सांगुन ट्रकचा शोध घेतला मिळुन आला नाही. सदरचा ट्रक कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला अशा तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक विश्व पानसरे,अपर पोलिस अधिक्षक खामगाव अशोक थोरात यांनी सदर गुन्हा उघडकीस आणनेकामी मार्गदर्शन करुन सुचना दिल्याने तात्काळ पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक रवाना करुन गोपनीय माहीतीवरुन तसेच सिसिटीव्ही व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण वरुन यातील आरोपी प्रितम अजबराव वानखेडे (वय 33 वर्षे), रा. सिद्धार्थ नगर, चिखली ह. मु. यशोधरा नगर, खामगाव यास निष्पन्न करुन त्याचा शोध घेतला असता तो खामगाव ते मुक्ताईनगर हायवे रोडवर घोडसगाव शिवारातील मॉ करणी राजस्थानी हॉटेल परीसरात सदर ट्रक क्रमांक MH 30 L 4684 सह मिळुन आला.

सदर नमुद आरोपीस ताब्यात घेवुन तपास केला असता नमुद आरोपी याने सदरचा ट्रक जळगाव येथे स्क्रैप करुन विकण्याचे उद्देशाने चोरी केल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यातून टाटा कंपनीचा ट्रक MH 30 L 4684 ज्याची किं. 5 लाख 50 हजार रु. हा जप्त करण्यात आला असुन . नमुद आरोपीचा सदर गुन्हयाचे तपासकामी कोर्टातुन (दि.13नोव्हेंबर) पावेतो पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला असुन विचारपुस करण्यात येत आहे सदर आरोपीकडुन इतर पो.स्टे.ला ट्रक चोरी संदर्भाने दाखल गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल हा जप्त केला असून पुढील तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही हि पोलिस अधिक्षक विश्व पानसरे,अपर पोलिस अधिक्षक खामगाव अशोक थोरात,उपविभागिय पोलिस अधिकारी,खामगाव विनोद ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्थागुशा अशोक लांडे, पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, पो.स्टे. खामगाव ग्रामीण,सहा पोनि रवि मुंडे,पोहवा कैलास चव्हाण, शिवाजी दळवी,पोशि त्रिशुल ठाकरे,पोहवा मनिष कवळकार, प्रमोद जाधव, राजु आडवे सायबर सेल, बुलडाणा यांनी केली आहे.


