
व्हिडीयो गेम पार्लरवर हिंगणघाट डि बी पथकाचा छापा,४ आरोपींसह साहीत्य जप्त…
इलेक्ट्रिक व्हिडिओ गेम पार्लरवर हिंगणघाच डी बी पथकाचा छापा,जुगाराचे साहीत्यासह चौघांना घेतले ताब्यात….
हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्यासंदर्भात आदेशीत केले होते त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक मनोज गभने पोलिस स्टेशन हिंगणघाट यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या डि बी पथकास मार्गदर्शन करुन कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात आल्या


त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी पथकाचे अंमलदार हे दि 11 जानेवारी रोजी पोलिस ठाणे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की,सरकारी दवाखाना चौकातील अथर्व भोजनालयाचे बाजूला टीनाचे शटरचे दुकानात इलेक्ट्रानिक कॉइन मशीन वर चाबीचा वापर करून असलेल्या नंबरवर पैशाचा हार जितचा खेळ करून विविध आकडे वर पैसे लाऊन हार जितचा जुगार खेळत आहे.

अशा मिळालेली गोपनीय माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांनां देऊन .प्रभारी ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात माहीती प्रमाणे गेम पार्लरवर पंच व पो स्टाफच्या मदतीने छापा टाकला असता आरोपी चेतन अंकुश कोहाड वय 19 वर्ष रा. संत चोकोबा वॉर्ड, हिंगणघाट हा वैभव फुलझेले रा फुकटा ता. हिंगणघाट याचे सांगण्यावरून इलेक्ट्रॅानिक व्हिडिओ गेम पार्लर मधील मशीन वर जुगार खेळ खेळवित असतांना 1) साहिल धनराज लोखंडे 2) अतिश विनायक सातपुते 3) नितीन श्रीराम ढोक 4) दीपक विष्णुपंत बघमारे रंगेहात मिळून आल्याने त्याचे ताब्यातून 1) वेगवेगळ्या कंपनीच्या 05 इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीन कीं 1,25,000 रू. 2)इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीन चालवणाऱ्या चालकाच्या अंगझडतीत जुगार खेळाचे नगदी 3250/-रू.3) एक निळ्या रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल की 15,000/-रू 4) 03 नग स्टूल की 600/-रू 5) 04 आरोपीचे अंगझतीत 750/- रू. असा एकूण कीं 1,44,570 /-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिस स्टेशन हिंगनघाट येथे आरोपीं विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक अनुराग जैन,अप्पर पोलिस अधिक्षक डाँ. सागर रतनकुमार कुमार कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी,हिंगणघाट रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोज गभने, व प्रभारी ठाणेदार चंद्रकांत पाटील यांचे आदेशाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे अधिकारी सपोनि अनिल आळंदे, पोलिस हवालदार प्रशांत ठोंबरे, नापोशि राहुल साठे, विवेक वाकडे,पोशि मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली.


