बार्शीटाकळी बेटींग प्रकणातील मुख्य आरोपीस बंगलोर विमानतळावरुन घेतले ताब्यात,लुक आऊट नोटीस ची पहीलीच कामगिरी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बार्शिटाकळी ऑनलाईन बेटींग प्रकरणातील फरार आरोपीस बँगलोर विमानतळ येथुन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… LOC (लुक आऊट सरक्युलर) द्वारे अटकेची अकोला जिल्हयातील पहिली कारवाई….

*अकोला स्थानिक गुन्हे शाखेचा पोलिस स्टेशन बार्शिटाकळीहद्दीत आंतराज्यिय क्रिकेट बुकीवर छापा*







 



अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १८. फेब्रुवारी २०२५ रोजी. पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक LCB शंकर शेळके यांना गोपनीय माहीती मिळाल्यावरून पो.स्टे. बार्शिटाकळी हद्दीतील ग्राम येवता ते कातखेड रोडवर कातखेड शिवारात वैभव हॉटेल चे मालक रविंद्र विष्णुपंत पांडे याचे शेतातील तीन मजली इमारतमध्ये पहिल्या व दुस-या मजल्यावर काही इसम मोबाईल, लॅपटॉप द्वारे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विनापरवाना पैश्याचे हारजितचा ऑनलाईन खेळ खेळवितांना मिळुन आले होते.

सदर कारवाईमध्ये एकुण ३३ आरोपी मिळून आले होते व नमुद आरोपी विरुद्ध पो.स्टे. बार्शीटाकळी येथे ६०/२०२ कलम कलम 318 (4), 112 (2), 3(5) भारतीय न्याय सहींता सहकलम 4, 5 महा. जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली व  त्यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे कडे देण्यात आला. सदर गुन्हयात घटनेपासुन मुख्य ०२ आरोपी फरार होते.

सदर गुन्हयाचा तपासादरम्यान आरोपी क्र १ महेश बाबाराव डिक्कर याचे त्याचा साथीदार आरोपी क्र २  मोनीश गुप्ता रा. पुणे याचे सोबत ऑनलाईन बेटींग संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच महेश डिक्कर हा ऑनलाईन वेटींग बाबत प्रशिक्षण घेण्यासाठी दुबई येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून पोलिस अधिक्षकांचे  आदेशाने दोन्ही फरार आरोपींची तात्काळ पासपोर्ट माहिती करून LOC (लुक आऊट सरक्युलर) उघडण्यात आली होती. तसेच आरोपी यांची तपासात माहिती घेतली असता आरोपी  महेश बाबाराव डिक्कर हा नागपुर, चैन्नई, हैद्राबाद, बेंगलोर येथुन ब-याचे वेळा श्रीलंका व दुबई येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते.

तसेच आरोपी महेश बाबाराव डिक्कर रा. लोहारी खुर्द ता. अकोट जि. अकोला हा दि ०६ मार्च रोजी आंतराष्ट्रीय विमानतळ बेंगलोर कर्नाटक येथुन विमानाने श्रीलंका येथे पळून जाण्याचे बेतात असतांना विमातळ प्रशासनाकडे LOC (लुक आऊट सरक्युलर) प्राप्त असल्याने नमुद आरोपी यास बँगलोर विमानतळावर विमातळ प्रशासन यांनी अडवुन स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचेशी संपर्क केला. त्यावेळी पोलिस अधिक्षक यांचे परवानगीने तात्काळ पो.उप.नि. गोपाल जाधव व पो.अंम. अब्दुल माजीद यांनी तात्काळ नागपुर येथुन विमानाने रवाना होवुन आरोपीस ताब्यात घेवुन दि ७  रोजी नमुद आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता नमुद आरोपीस दि १० मार्च रोजी पर्यंत (०४ दिवस) पोलिस कोठडी रिमांड मिळाला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक  बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे पो.नि. शंकर शेळके, स्था.गु.शा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. गोपाल जाधव स्था.गु.शा. स. फौ. सुनिल थामोळे (जिल्हा विशेष शाखा) व स्था. गुशा. अकोला येथील अंमलदार अब्दुल माजीद, गोकुळ चव्हाण, रवि खंडारे, अक्षय बोबडे, स्वप्नील खेडकर, धिरज वानखडे, सतिश पवार यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!