
क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळवणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,नगदीसह ४२ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
घुग्घुस येथे ऑनलाईन क्रिकेट बेटींग वर स्थानिक गुन्हे शाखेचा ऱ्छापा नगदी ३ लाख रक्कम व लाखो रूपयांच्या ऑनलाईन जुगार आय. डी. सह ४२ लाख रूपयांचा मुद्देमाल केला जप्त….
चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यातील अवैध धंदे याचेवर कार्यवाही कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि १७ मार्च रोजी पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, सुगंधीत तंबाकु तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणे कामी रवाना होवुन पोलिस स्टेशन, घुग्घुस परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर व्दारे गोपनीय माहीती मिळाली की, म्हातारदेवी, घुग्घुस येथे राहणारा अंशुल रामबाबु रॉय, वय-२६ वर्ष, रा. म्हातारदेवी, चिंत्तामणी कॉलेज जवळ, घुग्घुस, ता. जि. चंद्रपुर हा आपले राहते घरी मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने सध्या सुरू असलेली लिजेंड लिग भारत विरूध्द वेस्टइंडिज या क्रिकेट मॅचवर सट्टा (क्रिकेट बेटींग) घेत आहे


अशा गोपनीय खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद इसमांचे घरी छापा टाकुन त्याचेकडुन १) एक अॅपल आय फोन कंपनीचा मोबाईल किमंत १,००,०००/- रूपये तसेच २) आरोपीचे अंगझडतीत नगदी ३,००,०००/- रूपये व ३८ लाख रूपयाची ऑनलाईन जुगार आय. डी. सह एकुण ४२ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून नमुद आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन घुग्घुस येथे महाराष्ट्र जुगार कायद्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर करीत आहे.

सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन,अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, मधुकर सामलवार,सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार,सतिश अवथरे,रजनिकांत पुठ्ठवार,दिपक डोंगरे, पोशि/प्रशांत नागोसे,किशोर वाकाटे,शशांक बदामवार,अमोल सावे, चापोशि/मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.



