
गोवंशीय जनावरांचे कत्तली प्रकरणी ६ आरोपी अटकेत कोतवाली पोलिसांची कार्यवाही…
गोवंशीय जनावरांना डांबून ठेवत त्यांची कत्तल केल्याप्रकरणी
वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण ५,६०,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन,६ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
अहमदनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना शहरातील झेंडीगेट परिसरात काही गोवंशीय जनावरांना डांबुन ठेवुन त्यांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणाची माहिती मिळताच यादव यांनी गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना खात्री करुन छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले.पथकाने तात्काळ कारी मस्जिदजवळ शोध घेतला असता एका बंद खोलीत गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले तब्बल २००० किलो गोमांस आढळून आले. तसेच त्याचं परीसरात शाळा क्रं ४ जवळ मागील बाजुस एकुण ८ गोवंशीय जणावरे आढळून आली. असा एकुण
५ लाख ६० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन याप्रकरणी


१)फैसल अस्लम शेख-वय १९ वर्ष

२)राशीद इलीयास कुरेशी – वय २२ वर्ष

३)औवेस राशीद शेख – वय २४ वर्ष
४)रहेमुद्दीन महेबुब करेशी – वय २६ वर्ष
५) मुसाविर युनुस कुरेशी – वय २१ वर्ष
६) मोहमीद नजिर एहमद कुरेशी – वय २३ वर्ष
सर्व राहणार अहमदनगर
यासर्व आरोपीवर भा.द.वि. कलम २६९ महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियम सन १९९५ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (क) ९ (अ) सह प्राणी क्लेष प्रतिबंध अधिनियम सन १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदिप थोरात, सोमनाथ राऊत, अमोल गाढे, इनामदार, सुजय हिवाळे, सलिम शेख, अतुल काजळे, अभय कदम यांनी केली


