
गांजाची खुलेआम विक्री करणार्यास कोतवाली पोलिसांनी सापळा लावुन केले जेरबंद…
अहमदनगर – सवीस्तर व्रुत्त असे की नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार सध्या समोर आला असून शहरांमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या एका इसमाला कोतवाली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलेले आहे. त्याच्याकडून 6200 किमतीचा सुमारे 363 ग्राम गांजा जप्त करण्यात आलेला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
जुनेद मुजाहिद शेख (वय 33 राहणार
बेलेश्वर कॉलनी विजय लाईन अहमदनगर)


असे आरोपी व्यक्तीचे नाव असून शनिवारी शनिचौक ते सबजेल रोडवर पत्र्याच्या शेडच्या आडोशाला तो गांजाची विक्री करत
असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुप्त
सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली होती. पोलिस निरीक्षक यादव यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या त्यानंतर आरोपीवर पथक पाळत ठेवून होते. पोलिस आपल्या पाळतीवर आहेत हे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेत 62 पुड्यामध्ये 363 ग्राम गांजा आढळून आला.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस
अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल
कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर
यादव, यांचे आदेशाने पोलिस सब इन्स्पेक्टर प्रवीण पाटील, पोलीस हवालदार तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे यांच्या पथकाने केली.



