
दुचाकींची चोरी करुन तिचे सुटे भाग भंगारात विकणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
दुचांकीची चोरी करुन ती भंगारात विकणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,२ आरोपी अटकेत…
अकोला(प्रतिनिधी) –याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरात तसेच जिल्हयाभरात मोटार सायकल चोरी चे प्रमाण वाढत असून त्यावर प्रतिबंध लावून गुन्हे उघडकीस आनण्या करीता, पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा, अकोला यांना आदेशीत केले असता, पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी त्याचे अधिनस्त एक अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक गठीत करण्यात आले होते.त्यानुसार
दिनांक ०४/०२/२०२४ रोजी फिर्यादी जुबेर अहेमद मोहम्मंद युनूस रा. हाजी नगर, अकोट फाईल अकोला तसेच मोहम्मंद न्यास अहेमद रा. अकोट फाईल अकोला असे दोघांनी पो.स्टे अकोट फाईल अकोला येथे रिपोर्ट दिला की त्यांचे मालकिची होंन्डा अॅक्टीव्हा आणि एक ईलेक्ट्रीक मोटार सायकल अशा अकोट फाईल परिसरातुन चोरीस गेल्या आहे अशा दोघांच्या तक्रारी वरून अप नं ९९/२०२४ कलम ३७९ भादंवि, अप नं १०० / २०२४ कलम ३७९ भादंवि प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले होते.
सदर दोन्ही मोटार सायकली चोरीच्या अनुषंगाने स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील गठीत पथकास त्यांचे गोपनिय बातमीदारा मार्फेत माहीती मिळाली की, वर नमुद दोन्ही मोटार सायकली ह्या


१) शेख आबीद शेख जैनोद्दीन वय ४८ वर्ष रा. कुबाह मस्जीद जवळ, भारत नगर अकोट फाईल अकोला

याने चोरल्या आहेत यावरून पथकाने सदर ईसमास ताब्यात घेवून सदर दोन्ही गुन्हया बाबत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुली दिली. तसेच त्याने सदर मोटार सायकली ह्या त्याचा मित्र

२) शेख कबीर शेख रफिक वय ४४ वर्ष रा. भारत नगर, अकोट फाईल अकोला
याचे मदतीने सदर चोरीचे वाहन तोडून ते भंगारात विक्री केल्याचे सांगितले, त्याचे कडून गाड्यांचे भंगार विक्री करून प्राप्त झालेले नगदी २८,०००/-रू आणि ईलेक्ट्रीक वाहनाच्या ०४ बॅटऱ्या कि अं १२,०००/- रू असा एकुण ४०,०००/- रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींना पुढील तपास कामी पोलिस स्टेशन अकोट फाईल अकोला याचे ताब्यात देण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे,पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे सपोनि. कैलास डी.भगत, पोउपनि. गोपाल जाधव,पोशि रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, विशाल मोरे, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, एजाज अहेमद, भिमराव दिपके यांनी केली आहे.


