बॅग लिफ्टिंग प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला मध्यप्रदेश मधून उचलले
बॅग लिफ्टिंग प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील आरोपीला मध्यप्रदेश मधून उचलले
अकोला – बॅग लिफ्टींग च्या घटनांतील आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी टोळीतील आरोपीला पकडुन त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
दि.२६नोव्हेंबर रोजी फिर्यादी नामे राजु वेलाजी प्रजापती (वय २६ वर्ष), रा. आंगडीया सर्व्हस घर क.१०१ गजानन टॉवर शंकर नगर रोड राजापेठ अमरावती हे त्यांच्या व्यापाराचे पैसे घेवून ट्रॅव्हल्स ने अमरावती येथून मुंबई येथे जात असता पोलीस स्टेशन पातुर हद्दीतील क्वालीटी धाब्यावर बस थांबल्यानंतर फिर्यादी हे गाडीचे बाहेर आले असता तेवढ्यातच संधी साधून आरोपीतांनी सदर ट्रॅव्हल्स मध्ये प्रवेश करून फिर्यादीची पैश्याने भरलेली बॅग चोरून फरार झाले होते. या वर पोलीस स्टेशन पातुर येथे अपराध नं ५३२/२३ कलम ३७९ भा.दं.वि नोंद असून तपासावर आहे. सदर चोरीची उकल करण्यासाठी पोलीस अधीक्षक सो, अकोला यांनी स्थागुशा अकोला यांना आदेशीत केले होते. त्या वर पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थागुशा यांनी त्यांचे अधिनस्त एक पथक तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणण्या करीता रवाना केले होते.
पोनि. शंकर शेळके स्थागुशा अकोला यांच्या आदेशावरून तसेच मार्गदर्शनाखाली सपोनि. कैलास डी.भगत, पोउपनि गोपाल जाधव व पो.अमंलदार यांनी सदर गुन्हयाचा छडा लावण्यासाठी गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक बाबीच्या आधारे सदर गुन्ह्यातले आरोपी निष्पन्न केले. स्थागुशा अकोला येथील पथक हे मध्यप्रदेश येथे रवाना होवून त्यांनी ग्राम खेरवा ता. मनवार जि.धार येथील आरोपी नामे विनोद विश्राम चव्हाण (वय १९ वर्ष), रा. लुन्हेरा बुजूर्ग ता. मनावर जि.धार याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून गुन्ह्या संबंधाने विचापूस केली असता, त्याच्या राहते घरातुन रोखरक्कम ७९,००,०००/- दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आले. त्यावरून त्यास त्याचे साथीदार नामे रहेमान उर्फ पवली गफुर खान याला पोलीसांची चाहुल लागल्याने तो फरार झाला. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.