कुख्यात गुंड विनायक यास अकोला पोलिसांनी केले स्थानबध्द…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अकोला येथील कुख्यात गुंडास एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये
एक वर्षाकरीता स्थानबध्…..

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सोपीनाथ नगर, कॅनॉल रोड, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड





विनायक महेंद्र येन्नेवार वय २४ वर्ष,डाबकी रोड



याचे वर यापुर्वी जबरी चोरी करतानां इच्छापुर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करण्याचे उद्देशाने अपहरण करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, घरात घुसून खंडणी मागुन नुकसान करणे, अश्लिल शिवीगाळ करणे, सार्वजनिक ठिकाणी आपसात झोंबाझोंबी करणे, दरोडयाचा घालण्याची पुर्वतयारी करणे, मालमत्तेचे बंद ठिकाण फोडुन चोरी करणे, असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा तो कुठल्याही कारवाईस जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन  विनायक महेंद्र येन्नेवार, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा
याकरीता  पोलिस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी,अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात कुख्यात गुंडाविरूध्द एमपीडीए कायदया अंर्तगत स्थानबध्द आदेश पारीत केले मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांचे आदेशावरून विनायक महेंद्र येन्नेवार, यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक ०७/०२/२०२४ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलिस अधीक्षक, बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक,अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर उपविभाग, अकोला, सतिश कुळकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे, पोहवा ज्ञानेश्वर सैरीसे, पोशि उदय शुक्ला यांनी तसेच पो.स्टे. डाबकी रोड, अकोला
येथील पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे, पोहवा. उमेश पाटील, नापोशि प्रविण इंगळे, पोशि उमेश सुगंधी यांनी परिश्रम घेतले. अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती येणा-या निवडणुका तसेच आगामी काळात सन-उत्सवाचे अनुषंगाने संकलीत करण्यात आली असुन काही गुन्हेगांराविरूध्द एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली
कार्यवाही प्रस्तावित आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!