
वाहन चोरट्यांना अकोला पोलिसांनी केली अटक…
वाहन चोरट्यांना अकोला पोलिसांनी केली अटक…
अकोला (प्रतिनिधी) – अकोला पोस्टे. एमआयडीसी यांनी महिंद्रा शोरूम येथील स्टॉक यॉर्ड मधुन आरोपीतांनी चोरून नेलेल्या फोर व्हिलर तीन गाडी ज्यामध्ये दोन महिंद्रा गाडी, एक महिंद्रा स्कॉपिओ एन झेड टु तसेच दोन मोटर सायकल एकुण किंमत (सत्तर लाख) रू. च्या गाडीचा शोध लाऊन आरोपीतांना अटक केली आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.०६मे) रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, संध्याकाळी १९:३० वा.सु. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये फिर्यादी व त्यांचा मित्र दिपक वंक्टे हे जेवण करून दोघे जण मोटरसायकलने फिरत असताना रात्री २२:०० वा.सू. त्यांचे महिंद्रा फोर व्हिलर स्टॉक यॉर्ड मधील नंबर नसलेली नवीन फोर व्हीलर गाडी XUV 700 गाडी स्पेशल ईडीशन ब्लेज मॅटफिनिश रेड रंगाचा गाडी किंमत २६,००००० /- (सव्वीस लाख) गाडी हि अकोला शिवणी विमानतळाकडे जात असताना दिसली. गाडीमध्ये दोन अज्ञात इसम गाडी चालविताना दिसुन आले त्यांना आवाज देऊन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते गाडी घेऊन पळुन गेले वरून फिर्यादी यांनी स्टॉक यॉर्ड मध्ये जाऊन पाहीले असता फोर व्हीलर गाडी XUV 700 गाडी स्पेशल ईडीशन ब्लेज मॅटफिनिश रेड रंगाचा हि गाडी दिसुन आली नाही या वरून सदरची गाडी कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरून नेली आहे, अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून गून्हा तपासात घेतला.

सदर गुन्हयाचे तपासात पोस्टे. एमआयडीसी अकोला यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास करून मिळालेल्या माहीतीचे आधारे गुन्हयातील आरोपी १) मिर्झा अबेद बेदमिर्झा सईद बेग रा.कलाल चाळ अकोला यास व चार विधी संघर्षग्रस्त बालक यांना तपास कामी ताब्यात घेऊन तपासा दरम्यान गुन्हयातील चोरीला गेलेले वाहने एकुण तीन फोर व्हिलर गाडी ज्यामध्ये दोन महिंद्रा गाडी XUV 700, प्रत्येकी किं.२६ लाख एकूण ५२ लाख तसेच एक महिंद्रा स्कॉर्पिओ एन झेड टु पांढ-या रंगाची फोर व्हिलर गाडी किंमत १७ लाख रूपये तसेच गुन्हयात वापरलेल्या दोन मोटर सायकल प्रत्येकी किंमत ५० हजार रूपये असा एकुण १ लाख रू. सर्व मुद्देमालाची किंमत (सत्तर लाख) रू. या तपासात जप्त करण्यात आल्या आहेत. सदर गुन्हयात आणखीन वाहने मिळुन येण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारे सदरची कार्यवाही हि पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतिश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वैशाली मुळे एमआयडीसी अकोला पोउपनि. सुरेश वाघ, एएसआय विजय जामनिक, एएसआय राठोड, पोहेकॉ. विजय अंभोरे, अजय नागरे, मोहन ढवळे, सुनिल टाकसाळे, उमेश इंगळे, पोकॉ. मोहन भेडारकर, भुषण सोळंके, अनुप हातोळकर, सचिन घनबहादुर, निलेश वाकोडे, सर्व पोलिस स्टेशन एमआयडीसी अकोला यांनी मिळून केली आहे.


