IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा..
IPL जुगारावर सहा.पोलिस अधीक्षकांचे पथकाचा छापा,७ जुगारींना घेतले ताब्यात…..
अकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(८) रोजी स्थानिक तेल्हारा शहरामध्ये टावर चौक, तेल्हारा येथे एक
इसम सध्या चालु असलेल्या आय. पी. एल. मॅचवर हारजीतवर पैशाने मोबाईलवरुन सट्टा खेळत आहे अशी गुप्त बातमी मिळाली
यावरुन सदर ठिकाणी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी अकोट यांचे पथकाने छापा टाकुन टावर चौक तेल्हारा येथील कैलास हॉटेल जवळुन इसम नामे सोनु शिवदास जिंदे वय २९ वर्ष, व्यवसाय शेती, रा. भाजी मंडी रोड तेल्हारा याचेजवळुन दोन मोबाईल, एक बाजुला ठेवलेला लॅपटॉप व रोख १६२०/- रुपये तसेच १) हरीओम शिवशंकर अवचार याचेजवळुन एक मोबाईल किंमत ४०,०००/- रुपये २) दिनेश ओमप्रकाश छांगाणी याचेजवळुन एक मोबाईल किंमत १७०००/- रुपये सदर गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपी १) तुषार शर्मा याचेजवळुन एक मोबाईल किंमत २०,०००/- रुपये, २)निखिल ठाकुर याचेजवळुन एक मोबाईल किंमत १५,०००/- रुपये ३)बबलु ठाकुर याचेजवळुन एक मोबाईल किंमत १६,०००/- रुपये असा एकूण १,३३,६२०/- रुपयाचा मुद्देमाल असा एकूण १,८४,६२० /- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी नामे (१) सोनु शिवदास जिंदे, वय २९ वर्ष, व्यवसाय शेती, रा. भाजी मंडी रोड तेल्हारा हा दि.(८) रोजी रात्री ८.०० ते ९.०० वा चे दरम्यान कैलास हॉटेल, टावर चौक तेल्हारा येथे आय. पी. एल. २०२४ क्रिकेट मॅच सी. एस. के. विरुध्द केकेआर या सामन्यावर विविध लोकांना आय. डी. देवून त्यावर पैसे लावून हारजीतचा खेळ खेळतांना मिळून आला. तसेच व्हॉटसअॅपव्दारे क्रिकेटचा जुगार खेळतांना सुलभ होईल असा सल्ला वर नमुद लोकांना देतांना मिळून आल्याने तसेच फोन पे व्दारे ट्रॉन्जेशन करतांना मिळून आला. म्हणून (१) सोनु शिवदास जिंदे, (२)संकेत शेळके, (३) दिनेश छांगाणी (४) हरीओम अवचार (५) निखील ठाकुर (६) तुषार शर्मा, (७)बबलू भाऊ ठाकुर यांच्याविरुध्द पोलिस स्टेशन तेल्हारा येथे अप.क्र. ९२/२०२४ कलम १२ (अ) म. जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक बच्चन सिंग,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,सहा.पोलिस अधिकारी तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,अकोट अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पो. हवा. अनिल शिरसाट , आर. सी. पी. पोलिस
अंमलदार पोशि. आशिष साबळे, किरण अटाळकर, मपोकॉ. दिपा घिटरे यांनी केली आहे.