व्रुध्द महीलेस लुटणारा ॲटोचालक अकोला पोलिसांचे ताब्यात…
वृध्द महिलेस ऑटोमध्ये बसवुन तिचे पर्समधुन पैसे चोरी करणारा चोरटा काही तासात पोलिस स्टेशन सिव्हील लाईन अकोला यांचे जाळयात…..
अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिव्हील लाईन हद्दीत दि. १४.१२.२०२३ रोजी सायकांळी ०६.०० वा ते ०६.३० वा दरम्यान नविन बस स्टॅड ते शिवर जाण्यासाठी एक वृध्द महिला आपले सामानासह बस स्टँड येथील ऑटोमध्ये बसली असता ऑटोचालकाने त्याचे साथीदारसह केलेल्या संगणमताने वृध्द महिलेस गंडवुन तिचे पर्समधील १५,००० रू चोरी करून घेतले. सदर घटनेची माहीती पोलिस निरीक्षक प्रदिप सिरस्कर यांना कळताच ते स्टाफ सह घटनास्थळी पोहचुन घटनेची गांभीर्य लक्षात घेवुन आपले अधिनस्त डि. बी पथक कर्मचारी तसेच बस स्टँड चौकी वरील कर्मचारी यांना अज्ञात आरोपी शोध घेणे कामी तात्काळ रवाना केले. वरून पोलिस निरीक्षक यांचे मार्गशनाखाली नमुद गुन्हयातील फरार अज्ञात आरोपी निष्पन्न करून आरोपीचे मुसक्या आवळल्या
लागलीच पोलिस निरीक्षक प्रदिप सिरस्कर सिव्हिल लाईन यांनी बस स्टॅड अकोला येथे स्वतः जाऊन सर्व ऑटोचालक/मालकांना अशा प्रकारची घटना होवु नये तसेच कोणतेही बेकायदेशीर कृत्य घडुन नये म्हणुन सर्वांना तंबी देवुन आपले ऑटोमध्ये मध्ये ऑटो नंबर व ऑटोचालकांचा मोबाईल नंबर ठळक अक्षात लिहण्याचा सज्जळ दम दिला.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक संदिप घुगे , अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे , तसेच उपविभागीय पोलिस अधीकारी सुभाष दुधगावकर यांचे मार्गशनाखाली पोलिस निरीक्षक प्रदिप सिरस्कर, पोहवा हिंगणकर, नापोशि किशोर सोनोने, संजय अकोटकर, पोशि संतोष गांवडे, राहुल इंगळे, भुषन मोरे, गणेश निलखन यांनी केली