स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस ताब्यात घेवुन उघड केले ३ मोटारसायकल चोरीचे गुन्हे…
स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडून चोरीच्या गुन्हयातील अकोला जिल्हयातील दोन व अमरावती जिल्हयातली एक अशा एकुण ०३ मोटारसायकल किंमत अंदाजे १,७०,०००/- रू चा मुददेमाल जप्त करून आरोपीस केली अटक…..
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या घटनांमधे दिवसेदिवस वाढ झाल्याने पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशीत केल्याने पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी एक पथक तयार करून त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोउपनि राजेश जवरे यांचे पथकाला दि.(२८) रोजी मिळालेल्या गोपनिय माहीतीवरून आरोपी नामे शरद अशोक सहारे वय ३० वर्ष,रा. खानापुर वेस,अकोट ता. अकोट, जि. अकोला यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदाराचे मदतीने पोस्टे. बोरगाव येथील अपराध क्र. १६०/२४ कलम ३७९ भादवी मधील हिरो कंपनीची सीबी शाईन मोसा क्र. एमएच ३० बीए ६७७९ की. अंदाजे ७०,०००/- रूपये तसेच पोस्टे. मुर्तीजापुर शहर येथील अप.क्र.८९/२०२४ कलम ३७९ भादवी मधील हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल क्र. एम एच १४ बी क्यु ७९३२ किं ४०,०००/-रू अशा अकोला जिल्हयातील व पोस्टे. पथ्रोट जि. अमरावती ग्रामीण चे हददीतुन चोरी गेलेली ड्रीम युगा कंपनीची एक मोटारसायकल की. अंदाजे ६०,०००/- रूपये असा एकुण १,७०,०००/-रू चा मुददेमाल जप्त करून आरोपी पोस्टे. बोरगाव मंजु यांचे ताब्यात देण्यात आले. तसेच आरोपीने साथीदाराच्या मदतीने पोस्टे. अकोटफैल येथील अप.क्र.६०२/२३ कलम ३७९ भादवी तसेच पोस्टे. दर्यापुर जि. अमरावती गा. येथील अप. क्र.८१/२४ कलम ३७९, ३४ भादवी मधे चोरी गेलेली मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक बच्चनसिंह,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, पो.उप.नि राजेश जवरे, पोहवा.
उमेश पराये, फिरोज खान, सुलतान पठाण, रवी खंडारे, महेन्द्र मलीये, गोकुळ चव्हाण, नापोशि वसीमोददीन, पोशि आकाश मानकर, अभीषेक पाठक व चालक पोशि प्रशांत कमलकार तसेच सदर कार्यवाहीसाठी पो.स्टे. अकोट शहर येथील पो.उपनि. अख्तर शेख, पो.शि मनिस कुलट, विशाल हिवरे, रवि सदांशिव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.