
अवैधरित्या गावठी कट्ट्यासह एकास गुन्हे शाखेने उरळ हद्दीतुन घेतले ताब्यात…
अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणा-या आरोपीस गावठी पिस्टल व जिवंत काडतुस गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात…
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१५) रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पोउपनि गोपाल जाधव व पथकास येणा-या बकरी ईद सना निमीत्याने अवैधधंद्यावर कार्यवाही करणे बाबत पोनि स्थागुशा शंकर शेळके यांनी आदेशीत केले असता पथक हे बाळापूर उपविभागात अवैधधंद्यावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असता, त्यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली की एक इसम हा उरळ हद्दीतील कवठा गावाचे जवळ त्याचे ताब्यात गावठी पिस्टल बाळगून आहे


अशा मिळालेल्या माहीती वरून पथकाने माहीतीचे गांभीर्य पाहून सापळा रचून गावठी पिस्टल बाळगणा-या ईसमास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रघूविर तेलसिंग चौहाण वय ३० वर्ष रा. फुकट पुरा जलाराम मंदीर जवळ जळगाव जामोद जि.बुलढाणा याचे जवळील एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र ) ०५ जिवंत काडतुस त्याचे कडील वाहन व
ईतर साहीत्य असा एकुण ७१,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुध्द कलम ३,२५ आर्म अॅक्ट सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली असून आरोपीस
पुढील तपास कामी पो.स्टे उरळ यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोउपनि गोपाल जाधव, पोशि रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर,गोकूळ चव्हाण, वसीम शेख, भिमराव दिपके, चालक पो. हवा अक्षय बोबडे यांनी केली आहे.



