व्यापार्याला वाटेत मारहान करुन लुटणारी टोळी मुर्तिजापुर शहर पोलिसांनी केली जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वाईन शॉप मालकास अडवुन काठीने मारून त्यांचे जवळील १,४५००० रू बॅग लंपास करणारी टोळी मुर्तिजापुर शहर पोलिसांनी  शिताफीने केली जेरबंद….

मुर्तिजापुर(अकोला)प्रतिनिधि – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार राजेश मुलचंद गुप्ता वय ४४ वर्ष रा. शिवाजीनगर मुर्तीजापुर यांनी पोलिस स्टेशन मुर्तीजापुर शहर जि. अकोला येथे दि.(८) मे रोजी तक्रार दिली की त्यांचे गुप्ता वाईन शॉपी नावाचे विदेशी दारुचे दुकान असुन दि.(८)रोजी नेहमीप्रमाणे ते दिवसभरातील व्यवहाराचे १,४५०००/- रू बॅग मधे घेऊन मोटारसायकल आपले दुकान बंद करुन कारंजा लाड रोडने आपले घरी जात असतांना लाल शाळे जवळ दोन मोटार सायकलवर आलेल्या ४ ते ५ अज्ञात इसमांनी त्यांना अडवुन त्यांचे मोटार
सायकलला लाथ मारून त्यांना मोटार सायकल सह खाली पाडुन त्यांना लाकडी काठीने मारून त्यांचे जवळ असलेली १,४५०००/- रू रक्कम असलेली बॅग जबरदस्तीने हीसकावुन घेवुन गेले. अशा
फीर्यादीचे तोंडी तक्रारी वरून पोलिस स्टेशन मुर्तीजापुर शहर येथे अप क्र १९३ / २४ कलम ३९४,३४ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु होता





सदर गुन्हयाचे तपासात रेकॅार्डवरील गुन्हेगार तसेच यासंबंधी गुन्हे करणारे यांची कसुन चौकशी केली असता त्यातुन सौरभ शशिकांत बाळापुरे रा मुर्तीजापुर यांस निषपन्न केले व त्यास पुणे येथुन ताब्यात घेऊन त्यास सखोल विचारपुस केली असता सदर गुन्ह्यात धक्कादायक माहीती समोर आली की घटनेच्या दिवशी भलत्याच व्यापार्याला लुटायचा डाव त्यांनी आखला होता परंतु एनवेळी सदर व्यापार्याने रस्ता बदल्याने त्यांचा डाव फसला व ते सर्व दारु पिण्याकरीता गुप्ता वाईन्स या दुकानात गेले तिथे दुकानाचे मालक घरी जायच्या तयारीत दिवसभरातील गोळा झालेले पैसे बॅग मधे टाकतांना दिसले यावरुन रिकाम्या हातानी परत न जाता हा डाव रचुन गुप्ता यांना लुटले



तसेत मिळालेल्या माहीतीवरून यात १) विशाल बाबुलाल राउत वय १९ वर्ष रा. थीलोरी ता.दर्यापुर जि.अमरावती २) यश नंदकीशोर ननीर वय २० वर्ष रा. गौतमनगर मुर्तीजापुर ३) महेश सुधाकर गवई वय २२ वर्ष रा. जुने घरकुल मुर्तीजापुर ४) सौरभ शशिकांत बाळापुरे वय २१ वर्ष रा.काळा गोटा मुर्तीजापुर ५) अमरदीप राजेंद्र मोहोड वय २२ वर्ष रा. पहाडीपुरा, मुर्तीजापुर यांना गुन्हयासंबंधाने सविस्तर विचारपुस केली असता गुन्हयाची कबुली दिली. आरोपींकडुन गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हीरो स्प्लेंडर कंपनीची एम एच २७ डी पी ८२६२ की १,२०००० रूची, एक पॅशन प्रो मोटार सायकलक एमएच ३० ए एच ६३९५ की ३६०००/- रूची, एक जुना मोबाइल रेड नोट १० प्रो कंपीनीचा किं २१०००रू तसेच नगदी २००००रू असा एकुन १९७००० रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हामध्ये एकुण नऊ आरोपी असुन त्यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात आली  आहेत व उर्वरीत चार आरोपी अटक करणे बाकी आहेत. आरोपींना गुन्हयाबाबत सविस्तर विचारपुस सुरू आहे.



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक बच्चन सिंग अप्पर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी  मनोहर दाभाडे, याचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे,सहा पोलिस निरीक्षक अनंतराव वडतकर, पोउपनि गणेश सुर्यवंशी, शामसुंदर तायडे, पोहवा सुरेश पांडे, नंदकीशोर टिकार, सचिन दांदळे, मंगेश विल्हेकर, पोशि सचिन दुबे, गजानन खेडकर, स्वप्नील खडे, भुषन नेमाडे, नामदेव आडे यांनी केली असुन पुढील तपास
पो नि भाऊराव घुगे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी अनंतराव वडतकर करीत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!