
कत्तलीसाठी गोवंशाची वाहतुक करणारे SDPO अकोला यांचे पथकाने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात,७ गोवंशाची केली सुटका…
अकोला उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकाने कत्तलीसाठी वाहतूक होणाऱ्या सात गोवशांची केली सुटका….
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,शहरात गोवंशाच्या चोरी तसेच कत्तलीच्या उद्देशाने त्यांच्या अवैध वाहतूकीच्या गुन्हयांमध्ये वाढ होत असून त्यावर कठोर कार्यवाही करुन प्रतीबंध घालणेबाबत पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचेद्वारे सुचना प्राप्त आहेत.


त्याअनुषंगाने दि(17)ॲागस्ट 2024 रोजी उपविभागिय पोलिस अधिकारी,अकोला सतिश कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकास गोपनीय खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होणार आहे अशा प्राप्त गोपनिय माहीतीच्या आधारावर पथकाने पोलिस स्टेशन अकोट फाईल हद्दीतील आपातापा चौक आणि गुरुकृपा हार्डवेअर समोर म्हैसांग रोडवर नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान सदर पथकाला MH30BD1346 आणि MH47E0546 या क्रमांकाच्या मालवाहू मोटार वाहनातून एकून सात गोवंशाची जनावरे कत्तली करीता घेऊन जाण्याच्या उद्देशाने निर्दयतेने कोंबलेले मिळून आले

त्यामूळे सदर सात गोवंश किंमत 2,60,000/- रुपये आणि त्यांना वाहून नेण्याकरीता वापरलेली मालवाहू वाहने किंमत अंदाजे 8,50,000/- असा एकून 11,10,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि गोवंश ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणामध्ये दोन्ही मालवाहू वाहनांचे चालक 1) भावेश रविंद्र कंटाडे 2) आवेश खान सत्तार खांन आणि गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने खरेदी करणारे 3) रफीक कुरेशी 4) अबुजर अशा चार आरोपींविरुध्द पोलिस स्टेशन अकोट फाईल येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षन कायदा, प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कायद्याच्या विविध तरतूदी अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे आणि उपविभागिय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रत्नदिप पळसपगार, पोलिस अंमलदार अनिल खळेकार, रवि घिवे, मोहम्मद नदीम, राज चंदेल यांनी केली


