
कुख्यात गुंड सचिन बलखंडे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
कुख्यात गुंड सचिन मुकुंद बलखंडे यास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द….
अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची ११ वी कार्यवाही…


अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांचे आदेशाने अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील धोकादायक ईसमांचा शोंध घेऊन त्यांचेवर कार्यवाही करण्याचे सत्र सुरु आहे त्याअनुषंगाने

अकोला शहरातील शंकर नगर, अकोट फाईल येथे राहणारा कुख्यात गुंड सचिन मुकुंद बलखंडे वय ३० वर्षे याचे वर यापुर्वी खूनाचा प्रयत्न करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी दुखापत करणे, अपराध्याला वाचविण्यासाठी अपराधाचा पूरावा नाहीसा करणे किंवा खोटी माहिती देणे, इतरांचे जिवीत किंवा व्यक्तीगत सूरक्षितता धोक्यात आणणा-या कृतीने दुखापत पोहचवणे, नुकसान करुन आगळीक करणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे, शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धाक दाखविणे , अवैध बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगणे, हद्द्पारी आदेशाचे उल्लंघन करणे, अनुसूचीत जाती जमाती अत्याचार
प्रतिबंधक अधिनियमा अंतर्गत असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो या प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा पोलिसांना जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड
सचिन मुकुंद बलखंडे याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी त्यास. स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वत:चे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षाकरीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि.(३०) रोजी पारीत केला.
मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून सचिन मुकुंद बलखंडे यास सदरचे आदेश जिल्हा कारागृह अकोला येथे तामील करून त्यास दि(३०) रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सतिश कूळकर्णी, स्थानिक
गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि, आशिष शिंदे, पोहवा. ज्ञानेश्वर सैरिसे,पोशि. उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच पो.स्टे. अकोट फाईल येथील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू,
पोउपनि देविदास फूलंबरकर यांनी परिश्रम घेतले.

अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.


