अकोल्यात गावगुंडाचा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार,पोलिसांच्या कार्यशैली प्रश्नचिन्ह…
अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर वुत्त असे की अकोला शहरात एका गावगुंडानं एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अक्षरश: अमानवी अत्याचार केले असुन पिडीत मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यानंतर तिला कैलाशटेकडी स्मशानभुमीत नेऊन तिला विवस्त्र करुन तिची धिंड काढण्याचा प्रकारही उजेडात आला आहे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खळबळजनक आणि संताप आणणारी घटना अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
शहरातील कैलास टेकडी भागातीपरिसरात गुंड गणेश कुमरे याची दहशत आहे पिडीत मुलीचे वडील मजुरी करतात. तिला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ आहेय. गेल्या दोन वर्षांपासून या गुंडानं सातत्यानं दहशत माजवत मुलीवर सातत्याने अत्याचार केला आहे. मात्र, दोनदा पोलिसात जाण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांच्या अक्षम्य
दुर्लक्षामुळे निर्ढावलेल्या गावगुंडानं या मुलीचं अख्खं आयुष्यच बर्बाद केलं आहे. १५ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेबर या गणेश नामक
गुंडानं हैदोस घालत मुलीवर अनन्वित अत्याचार केला. शुक्रवारी या प्रकरणाची माहिती स्त्री चळवळीतील नेत्या आणि वंचितच्या प्रदेश महासचिव अरुंधती सिरसाट यांना मिळाली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. मात्र,अकोल्यातील खदान पोलिसांनी हे प्रकरण
असंवेदनशीलपणे हाताळल्याचा आरोप अरुंधती सिरसाट
यांनी अकोला पोलिसांवर केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीभाईला अटक करीत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहे. ३६३, ३७६, ३५४, बी, ३२३, ३२४,५०५, बाल सुरक्षा अधिनियम २०१२ नूसार ४ आणि ८ नूसार गुन्हे दाखल झाले. तर पिडीत मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. सध्या अकोला पोलिसांची यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही