मुर्तिजापुर पोलिस स्टेशन हद्दीत विनापरवाना देशी -विदेशी दारुचा साठा बाळगणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

मुर्तिजापुर(अकोला)- सवीस्तर व्रुत्त असे की  दि. १५/१०/२०२३ रोजी नवदुर्गा स्थापना निमित्ताने मुर्तिजापुर विभागात पोलिस अधिक्षक  अकोला यांचे आदेशाने पेट्रोलिंग करित असतांना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहिती वरून स्थानिक
गुन्हे शाखा अकोला येथिल पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा येथील पथकांनी जिल्हयातील पो.स्टे. मुर्तिजापुर ग्रामीण हद्दीत ग्राम धानोरा ब्रु. ता. मुर्तिजापुर जि. अकोला येथे राहणारा अनिकेत उर्फ भावेश रमेश राठोड हा त्याचे मालकीचे घरात अवैधरित्या देशी विदेशी दारू विकी करिता बाळगुन आहे अश्या बातमी वरून सदर ठिकाणी प्रोव्हिबिशन रेड केली असता आरोपी अनिकेत उर्फ भावेश रमेश राठोड वय २७ वर्ष रा. धानोरा बु. ता. मुर्तिजापुर जि. अकोला यास ताब्यात घेवुन त्यांचे जवळुन एकुण

१ )देशी दारू बॉबी संत्रा ९० एम.एल. चे २४०० नग कि. ८४०००/रु,





२) देशी दारू बॉबी संत्रा १८० एम. एल. चे २४० नग कि. १६८००/रू, ३) देशी दारू ७ स्टार ९० एम. एल.चे २०० नग कि. ५०००/रु



४) विदेशी दारू मॅकडॉल नं. १ चे १८० एम. एल. चे ४८ नग कि. ७२०० / रू



असा एकुण १,१३,००० / रूचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून पो.स्टे. मुर्तिजापुर ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आला.

सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक . संदिप घुगे , अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे  यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला व स.पो.नि. कैलास भगत, पोलिस अंमलदार दशरथ बोरकर, प्रमोद डोईफोडे, गोकुळ चव्हान, अन्सार अहमद, सतिश पवार चालक प्रशांत कमलाकर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!