
क्रिकेटच्या सामन्यावर जुगार खेळवणार्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या…
अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की देशात सुरू असलेल्या क्रिकेट वर्ड कप मॅच दरम्याण काही ईसम हे अकोला शहर व परिसरात फोन व्दारे क्रिकेट सामन्याचे हारजीतवर पैश्यांची बाजी लावून क्रिकेट बेटींग करत असल्याबाबत माहीती होती. यामुळे बरेच ईसम हे व्यसनाधीन होवून गुन्हेगारी कृत्याकडे वळत होते. म्हनुन सदर क्रिकेट बेटींग बाबत माहीती काढून कार्यवाही करणे बाबत पोलिस
अधीक्षक अकोला यांनी स्थागुशा, यांना आदेशीत केले होते. त्यामुळे स्थागुशा, प्रमुख पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी अधिनस्त
अधिकारी आणि अंमलदार यांना क्रिकेट बेटींग बाबत गोपनिय माहीती काढून त्यावर कार्यवाही करने बाबत, आदेशीत केले होते.
आज दिनांक २८/१०/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना खात्रीशीर माहीती मिळाली की, जुना भाजी बाजार अकोला येथे राहणारा ईसम ललीतकुमार सुरेखा हा त्याचे साथीदारांसह त्याचे घरात आज रोजी सुरू असलेल्या ऑस्ट्रेलीया विरूध्द न्युझीलॅन्ड या क्रिकेट सामन्यावर सामन्याचे हारजीतवर लोकांकडून पैश्याची खायवाडी करून क्रिकेट सट्टा खेळ चालवित आहे. या वरून त्यांनी सपोनि. कैलास डी. भगत व पथक यांना या ठिकाणी जावून तश्या प्रकारे गोपनिय माहीती घेवून कायदेशीर कार्यवाही करने कामी आदेशीत केले. या वरून सपोनि. कैलास भगत हे पथकासह मिळालेल्या माहीती प्रमाणे जावून जुना भाजीबाजार येथील ललीतकुमार सुरेखा यांचे घरी छापा टाकला असता त्या ठिकाणी ते साथीदारांसह क्रिकेट बेटींग करतांना मिळूण
आले. त्यांचे सोबत ईतर साथीदार
२) यश संजय सुरेखा वय २२ वर्ष व्यवसाय शिक्षण रा. तुलसीराम अपार्टमेंट, केडीया प्लॉट अकोला


३) राजकुमार व्दारकादास शर्मा वय ६२ वर्ष व्यवसाय मजुरी रा. रेणूकानगर, डाबकी रोड अकोला.

हे सुध्दा क्रिकेट बेटींग करतांना मिळूण आले. त्याचे कडून लॅपटॉप, टॅब, मोबाईल, राऊटर, व क्रिकेट बेटींग चे ईतर साहीत्य मोटार सायकल नगदी १७,०००/-रू अश्या प्रकारे एकुण २,०९,५००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी

१) ललीतकुमार देवीदत्त सुरेखा वय ६० वर्ष व्यवसाय किराणा दुकाण रा. जुना भाजी बाजार / मटका बाजार अकोला.
२) यश संजय सुरेखा वय २२ वर्ष व्यवसाय शिक्षण रा. तुलसीराम अपार्टमेंट, केडीया प्लॉट अकोला
३) राजकुमार व्दारकादास शर्मा वय ६२ वर्ष व्यवसाय मजुरी
रा. रेणूका नगर, डाबकी रोड अकोला
यांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन सिटी कोतवाली यांचे ताब्यात देण्यात येत आहे. अकोला शहरातील क्रिकेट बेटींग घेणारे आणखी ईसम असून त्या बाबत माहीती घेवून स्थागुशा, अकोला यांचे कडून धडक कार्यवाही करण्यात येत आहे..
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक संदीप घुगे , अपर पोलिस अधीक्षक . अभय डोंगरे ,उपविभागिय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे सपोनि कैलास डी. भगत, पो. अंमलदार. रविंद्र खंडारे, फिरोज खान, महेंद्र मलिये, अविनाश
पाचपोर, अब्दुल माजीद, एजाज अहेमद, भिमराव दिपके, स्वप्नील चौधरी, मपोअं. जोत्स्ना टाले आणि चालक प्रशांत कमलाकर, अनिल राठोड यांनी केली आहे.


