
कत्तलीकरीता जाणारी गोवंशीय जनावरांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने दिले जीवनदान…
अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की स्थानिक गुन्हे शाखेचे पथक
दि. २२/१०/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे गस्त,पेट्रोलिंगलकरीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन बातमी मिळाली कि, ग्राम वाडेगाव येथील इंदिरा नगर, झोपडपट्टी येथे एक ईसम गोवंश जातीचे जनावरे चोरून आणुन त्यांना निर्दयतेने वागणुक देवुन त्यांना कत्तली करिता नेण्याचा त्याचा ईरादा आहे अशा माहिती
वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस निरिक्षक शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचना व निर्देशना प्रमाणे स्थागुशा
येथील पथकांनी जिल्हयातील पो.स्टे. बाळापुर हद्दीतील ग्राम वाडेगाव येथील इंदिरा नगर झोपडपट्टी मध्ये राहणारा मोहम्मद असद मोहम्मद अशरफ वय २९ वर्ष याचे ताब्यातुन चोरून आणलेले गोवंश जातीचे ०८ जनावरे यास कत्तली करिता निर्दयतेने बांधुन ठेवलेले तसेच कत्तली करिता वापरण्यात आलेले सुरा व कु-हाड यांची एकुण किमंत २,४०,५००/रू चे मिळुन आल्याने जप्त करून पुढील कारवाई कामी पोलिस स्टेशन बाळापुर अकोला यांचे ताब्यात देण्यात आले.व त्या ८ मुक्या जनावरांची कत्तली पासुन मुक्तता करण्यात आली
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक संदिप घुगे,अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलिस उप निरीक्षक गोपाल जाधव, जी. पो.उप.नि. गोपीलाल मावळे, सफौ दशरथ बोरकर, पोहवा फिरोज खान, गोकुळ चव्हाण, प्रमोद ढोरे, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे, उमेश पराये महिला पो. हवा तुळसा दुबे, ना.पो.कॉ. खुशाल नेमाडे, पो.कॉ. लिलाधर खंडारे, अन्सार अहमद, स्वप्नील खेडकर, स्वप्नील चौधरी, शिवम दुबे, धिरज वानखडे, उदय शुक्ला, मोहम्मद आमीर, अभिषेक पाठक, सतिश पवार महिला पो.कॉ. तृष्णा घुमन व चालक ना.पो.कॉ. शेख नफीस पो.कॉ. अनिल राठोड, अक्षय बोबडे यांनी केली आहे.


