अकोला शहरातील कुख्यात गुंड याचेवर अकोला पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोट फाईल धोकादायक इसम सम्राट विजय सावळे वय ३० वर्ष रा.भिमचौक, अकोट फाईल अकोला  याचेवर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,अकोला जिल्हयातील १५ वी कार्यवाही…..

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला शहरातील, भिम चौक, अकोट फाईल येथे राहणारा कुख्यात गुंड सम्राट विजय सावळे याचे वर यापुर्वी घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे, हमला किंवा गैरनिरोध
करण्याची पूर्वतयारी करून गृहअतिक्रमण करणे, नुकसान करुन आगळीक करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासुन धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासुन धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत पोचवणे, अश्लील कृती करणे,
बेकायदेशीर जमावाचा घटक होणे, दंगा करणे, इतरांची जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करणे व कृतीने दुखापत पोचविणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, बेकायदेशिर रित्या शस्त्र बाळगणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.





त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याचे वर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड सम्राट विजय सावळे, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलिस अधिक्षक यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात
स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि.०१/०६/२०२४ रोजी पारीत केला.मा. जिल्हादंडाधिकारी,अकोला यांचे आदेशावरून सम्राट विजय सावळे याचा तात्काळ शोध घेवुन त्यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक ०१/०६/२०२४ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.



सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक, बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सतिश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा
येथील पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोउपनि आशिष शिंदे, पोहवा ज्ञानेश्वर सैरिसे, पोशि उदय ईश्वरीप्रसाद शुक्ला, तसेच पो.स्टे. अकोट फाईल येथील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडु, पोउपनि, देविदास फुलउंबरकर,पोलिस अंमलदार  प्रशांत इंगळे, संतोष चिंचोळकर, अस्लम शहा, गिरीष तिडके यांनी परिश्रम घेतले.



 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!