आगामी सन व लोकसभा निवडनुकीच्या पार्श्वभुमीवर अकोला जिल्हा हद्दीतील सराईत गुंडावर हद्दपार व स्थानबध्दतेची कार्यवाही…
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांची सराईत गुंडावर एमपीडीए-व हद्दपारीची कारवाई…
अकोला (प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हयातील ठाणेदारांना त्यांच्या पो.स्टे हद्दीत वारंवार मालमत्ते विरुध्द तसेच शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींची माहीती घेऊन त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी ठाणेदार यांना दिलेल्या निर्देशाप्रमाणे अकोला शहरातील पो.स्टे डाबकी रोड, जूने शहर, अकोट फाईल, सिटी कोतवाली हद्दीतील शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे एकुण ०५ सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए अन्वये स्थानबध्द करण्यात आले आहे. यामध्ये शरीराविरूध्दचे गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार नामे
१) राहूल मोहन रंधवे (वय-२३ वर्षे), रा-रामदासमठ, अकोट फाईल अकोला
२) मोहम्मद उमर मोहम्मद रियाज (वय-२१ वर्षे), रा-सैलानी नगर, डाबकी रोड अकोला
३) विनायक महेंद्र येन्जेवार (वय-२४ वर्षे), रा-डाबकी रोड, अकोला
४) शेख कासम उर्फ गुड्या शेख कबीर (वय २९ वर्षे) रा. गाडगे नगर, जुने शहर
५) शुभम संजय गवई (वय २९ वर्षे) रा. ईराणी झोपडपट्टी अकोला,
या गुन्हेगारांविरुध्द अकोला पोलिस दलाने स्थानबध्द करण्या बाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी अकोला यांच्या कडे सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच माहीती मिळवून सदर कुख्यात गुंड हे धोकादायक व्यक्ती असल्याचे खात्री झाल्याने त्यांना एम.पी.डी.ए अन्वये ०१ वर्षाकरीता महाराष्ट्रातील वेगवेगळया कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
तसेच पोलिस स्टेशन जूने शहर येथे टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार नामे
१) शेख बादशहा शेख मेहबूब (वय-३९ वर्षे)
२) शेख नाझीम शेख खालीक (वय ३६ वर्षे) दोन्ही रा-सोनटक्के प्लॉट, अकोला
यांचेवर कलम ५५ मपोका प्रमाणे ठाणेदार जुने शहर यांनी प्रस्ताव सादर केला होता. यावर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून, या टोळीतील दोन गुन्हेगारावर कलम ५५ मपोका अन्वये ०२ वर्षाकरीता अकोला जिल्हयातून हद्दपार केले आहे.
तसेच कलम ५६ मपोका प्रमाणे पोलीस स्टेशन चान्नी येथील
१) विजय जगदेव माहोरे (वय-४०वर्षे), रा-पिंपळखुटा ता. पातूर,पो.स्टे चान्नी याचा कलम ५६ प्रमाणे प्रस्ताव राजेश्वर हांडे उपविभागिय दंडाधिकारी बाळापूर, यांचे कडे सादर करण्यात आला होता. तसेच
२) जयराज सतिश पांडे (वय-२३ वर्षे) रा. रतनलाल प्लॉट यांना अकोला पो.स्टे. सिव्हील लाईन याचा कलम ५६ प्रमाणे प्रस्ताव डॉ. शरद जावळे उपविभागिय दंडाधिकारी अकोला, यांचे कडे सादर करण्यात आला होता. त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून सदर दोन ईसमांना वेगवेगळ्या कालावधी साठी जिल्हयातुन हद्दपार केले आहे.
अशा प्रकारे अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी या करीता अशा प्रकारचे सराईत गुन्हेगारांवर येणा-या लोकसभा निवडणुका २०२४ व आगामी सण, उत्सव काळात कठोर प्रतिबंधक कार्यवाही चालू राहील. असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.