गर्भवती महीला पोलिस कर्मचाऱ्यास मद्यधुंद मोटारसायकल चालकाची धडक महीला पोलिस कर्मचाऱ्यांचा उपचारा दरम्यान म्रुत्यु…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अमरावती–  मिळालेल्या माहीतीनुसार रात्री  ड्युटी संपवून घरी जात असताना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या मद्यधुंद दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या धडकेत गर्भवती महिला पोलिसाचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अमरावती शहरात शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रियंका बोरकर (वय 26 वर्ष रा. अमरावती) असं मृत महिला पोलिस कॉन्स्टेबलचं  नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकी चालक गौरव मोहोड याला अटक केली आहे. सवीस्तर व्रुत्त असे की प्रियंका बोरकर या ग्रामीण
पोलिसाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. त्या ८ महिन्यांच्या
गर्भवती होत्या. शनिवारी रात्री दोनच्या सुमारास प्रियंका ड्युटी संपवून आपल्या पतीसोबत दुचाकीवरुन जात होत्या. शहरातील गाडगे नगर मंदिरात त्यांची दुचाकी आली असता, पाठीमागून मद्यधुंद दुचाकीस्वार आला, त्याने प्रियंका यांच्या दुचाकीला जोरदार
धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की प्रियंका यांच्या डोक्याला मार लागला. अपघातात त्यांच्या पतीला देखील दुखापत झाली. दरम्यान, दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना प्रियंका यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मद्यधुंद दुचाकीस्वार गौरव मोहोड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच
पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. प्रियंका यांची
कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ओळख होती. ८
महिन्यांच्या गर्भवती असताना देखील त्या ड्युटी करत होत्या.
त्यांच्या मृत्युने पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!