
बबलु गाडे टोळीतील तडीपार गुंड कुंदन युनीट २ च्या ताब्यात…
बबलु गाडे टोळी मध्ये काम करणारा,तडीपार असलेला अट्टल गुन्हेगार कुंदन याला गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे दि(१६) रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, फिर्यादीला यातील आरोपी नामे १) प्रशांत राठी, २) अतुल पुरी, ३) बबलु गाडे व इतर अनोळखी ४ इसमांनी मिळुन संगणमत करून फिर्यादीला एका चारचाकी वाहनात बसवुन त्यांना महादेव खोरी परीसरामध्ये एका बंद घरामध्ये नेवुन नौकरी लावण्याकरीता झालेल्या आर्थीक व्यवहारातुन आरोपीतांनी त्यांचे जवळील चाकु, तलवार याचा धाक दाखवुन फिर्यादीस जिवाने ठार मारून टाकतो अशी धमकी दिली व जबरदस्तीने प्लास्टीकच्या पाईपने मारहान करुन खिशातुन ४२००/- रु तलवारीचा धाक दाखवुन बळजबरीने काढुन घेतले त्याचा ह्विडीयो आरोपींनी काढला तो व्हिडीयो तुझे नातेवाईकांना पाठवुन तुला फसवितो अशी धमकी दिली अशा फिर्यादी चे तक्रारी वरून आरोपींविरूध्द पोलिस स्टेशन, फ्रेजरपुरा अमरावती शहर येथे अपराध क्रमांक अप. क्र. १२७/२०२४ कलम ३९५, ३९७, ३६४, ३४२,३२४, ५०६ (ब) भा.द.वि प्रमाणे गुन्हा नोंद असुन त्याचा तपास सुरु होता
पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हेशाखा युनिट २ ने हा गुन्हा उघडकिस व आरोपीस अटक करण्याबाबत निर्देशीत केल्यावरून गुन्हेशाखा युनिट २ यांचे
पथकाने गुप्त बातमीदार नेमुण त्यास गुन्हया बाबत माहीती काढण्याबाबत सुचना देवुन पाळत ठेवली होती त्यादरम्यान दिनांक २३/०२/२०२४ रोजी गुन्हेशाखा युनिट २ अमरावती शहर येथील पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत खात्री लायक माहीती मिळाली की, वर नमुद गुन्हयातील बबलु गाडे टोळी मध्ये काम करणारा
कुख्यात तडीपार असलेला फरार आरोपी कुंदन हरीशचंद्र शिरकरे वय २२ वर्ष रा. यशोदा नगर अमरावती हा ऑक्सीजन पार्क येथे हातात शस्त्र घेवुन धुमधाम करीत आहे. अशा मिळालेल्या माहीती वरून गुन्हेशाखा २ पथकाने यशस्वी सापळा रचुन आरोपीस घेराव घालुन त्यास ताब्यात घेतले त्याचे ताब्यातुन एक लोखडी खंजर
मिळुन आले नमुद आरोपी हा तडीपार असतांना सुध्दा स्वतःजवळ शस्त्र बाळगुण पोलिस आयुक्त यांचे कलम ३७(१) (३) मपोका चे उल्लघंन केल्याने त्याचे विरूध्द पो.स्टे. फ्रेजरपुरा येथे अप. क्र. १५७/२०२४ कलम ४/२५ आर्म अॅक्ट सहकलम १४२, १३५ मपोका प्रमाणे कार्यवाही करण्यात आली.
सदर ची कारवाई पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हेशाखा कल्पना बारावकर,पोलिस उपायुक्त परीमंडळ – १ सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि सिमा दाताळकर, गुन्हे शाखा युनिट २ अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोशि राजेंद्र काळे, जावेद अहेमद, दिपक सुंदरकर, गजानन देवले, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, चेतन कराडे, राजीक रायलीवाले , योगेश पवार, निलेश वंजारी तसेच चालक संदिप खंडारे यांनी केली आहे.




