
बडनेरा पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….
बडनेरा पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले घरफोडीचे दोन गुन्हे…
अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे दि.17 फेबु्वारी रोजी फिर्यादी महेश सुतोष गिडवाणी वय 33 वर्षे धंदा – किराणा दुकान रा. सिंधी कॅम्प नवी वस्ती बडनेरा अमरावती याने रिपोर्ट
दि. 16/02/2024 चे 10/00 वा. ते दि. 17/02/2024 रोजी चे 03/30 वा. दरम्यान त्याचे किराणा दुकानातुन कोणीतरी अज्ञात चोराने एक नारळाचे पोते कि. अं. 2500/- रू., डेअरी मिल्क चॉकलेट चा बॉक्स कि. अं. 1500/- रू.व दुकानात ठेवलेले नगदी 3500/- रू. असा एकुण 7500/- रू. चा माल दुकानाचे शटर व कुलुप तोडुन चोरून नेला. अशा फिर्यादी च्या तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा दाखल करून तपास सुरु होता
सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान वरिष्ठ पोलिस निरिक्षक पुनीत कुलट यांचे आदेशाने तपास करीत असतांना दि. 20/02/2024 रोजी गुप्त बातमादारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली वरून आरोपी नामे प्रफुल्ल उर्फ गोल्या योगीराज शेंडे वय 33 वर्षे रा. मिलचाळ नवीन वस्ती बडनेरा यास सदर गुन्ह्यात अटक करून त्याचे ताब्यातुन सदर गुन्ह्यात चोरी गेलेला माल एक नारळाचे पोते कि. अं. 1500/- रू एक डेअरी मिल्क चॉकलेट बॉक्स कि. अं. 1500/-रू. व नगदी 1000/- रू. असा एकुण 45000/- रू. चा माल जप्त करण्यात आला.
तसेच सदर आरोपी याला अधिक विचारपुस केली असता पो. स्टे. बडनेरा येथे दाखल अप क्रं. 52/2024 कलम 457,380 भा. द. वि. मधील त्याने सदर गुन्ह्यात चोरी गेलेली LED TV चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे कडुन HYUNDAI कंपनीची LED TV अंदाजे किंमत. 15,000/- रू. असा एकुण 19,000/- रू. चा माल जप्त करण्यात आला
सदर कार्यवाही ही नविनचंद्र रेड्डी,पोलिस आयुक्त अमरावती शहर,पोलिस उपायुक्त परि – 1 , सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग कैलाश पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली बडनेरा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पुनीत कुलट, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे चे सफौ प्रमोद गुळदे ,पोहवा घनश्याम यादव,नापोशि इरफान रायलीवाले,प्रवीण ढेंगेकर,शशी शेळके ,प्रवीण राठोड,पोशि वचन पंडीत,रामकृष्ण कांगळे यांनी केली आहे.




