
सराईत दुचाकी चोरट्यांना गुन्हे शाखा युनीट २ ने केली अटक,३ मोटारसायकल केल्या जप्त…
दोन दुचाकी चोरट्यांना अमरावती गुन्हे शाखेने युनीट १ केली अटक…
अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनीट १ ने जलदगतीने कौशल्यपूर्ण तपास करून मोहमद अल्तमश ऊर्फ मोहमद ई्क्बाल (वय २० वर्षे) रा.बिसमिल्ला नगर पो.स्टे नागपुरी गेट अमरावती आणि अब्दुल तहसीन ऊर्फ अशफान अब्दुल फहीम (वय २२ वर्षे), रा.बिसमिल्ला नगर पो.स्टे. नागपुरी गेट अमरावती या दोन दुचाकी चोरट्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून हिरो होंडा कंपनीच्या तीन दुचाकी (किं.१ लाख) या जप्त केल्या आहेत.


1) हिरो होंडा स्प्लेंडर प्रो MH/27/BG/5378 अंदाजे किमंत 25,000 रू

2) एक लाल कलरची पॅशन प्रो गाडी विनानंबरची अंदाजे किंमत २५०००/- रु.

3) एक कथिया कलरची हो शाईन विना नंबर प्लेटफॉर्म अंदाजे किमंत ५०,०००/- रु. असा एकूण १,०००००/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची हिरो होडा कंपनीची मोटारसायकल क्र.एम.एच. 27/बीजी /5378 उभी करून दवाखान्यात नातेवाईकास भेटावयास गेले होते व परत आले त्यावेळी त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी त्यांची मोटर सायकल मिळून आली नाही कोणी तरी अज्ञात चोरट्याने गाडी चोरून नेली अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्र.१ अमरावती हे करत असताना गुप्त बातमीदाकडून मिळालेल्या माहीती वरून आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा उघड केला असून पुढील तपास सुरू आहे. यापुर्वीही गुन्हे शाखा युनीट १ कडुन यातील
आरोपी क्र १ – मोहमद अल्तमश ऊर्फ मोहमद ई्क्बाल (वय 20 वर्षे) रा.बिसमिल्ला नगर पो.स्टे नागपुरी गेट अमरावती
यास अटक करून त्यांच्याकडुन १७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली होती. त्या संबंधाने विविध पोलीस स्टेशनला दाखल ११ गुन्हे उघड केले होते, ते सर्व गुन्हे आरोपी क्र.१ व ३ यांनी मिळुन केले होते. परंतु
आरोपी क्र. २ – अब्दुल तहसीन ऊर्फ अशफान अब्दुल फहीम (वय 22 वर्षे), रा.बिसमिल्ला नगर पो.स्टे. नागपुरी गेट अमरावती
हा अटक झाला नसल्याने व तो पाहीजे आरोपी असल्याने त्यास (दि.९।फेब्रुवारी) रोजी अटक करण्यात आली असुन आरोपीकडून पो.स्टे. सिटी कोतवाली येथील गुन्हयातील गाडी सह अन्य दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक गाडी ही आरोपींनी नागपुर येथुन चोरी केल्याचे सांगत आहेत. मिळालेल्या दोन्ही गाड्यांबाबत तपास सुरू आहे. तसेच आरोपीकडून अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त सागर पाटील परीमंडळ २ , सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट क्र. १ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खॉन, सतीश देशमुख, नाईक पोलीस अमंलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलिस अंमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे, अमोल बहादरपुरे, भुषन पदमने, रोशन माहूरे, किशार खेंगरे यानी केलेली आहे.


