अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ उघड केला घरफोडीचा गुन्हा,आरोपींसह मुद्देमाल हस्तगत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट १ ने पो.स्टे. गाडगेनगर येथे दाखल घरफोडीचा गुन्हा केला उघड…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हददीमध्ये दाखल झालेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपआयुक्त मुख्यालय सागर पाटील व सहायक पोलिस आयुक्त गुन्हे  शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी व पोलीस अमंलदार हे आयुक्तालयातील दाखल घरफोडीच्या गुन्हांचा संमातर तपास करत असताना दिनांक 14/02/2014 रोजी फिर्यादी





रविन्द्र रामभाउ फुटाने वय 56 रा पटवारी कॉलनी अमरावती



यानी तक्रार दिली कि दिनाक 14/02/2024 चे दुपारी 2.00 ते 3.00 वा घराला कुलूप लावून बाहेर गेले असता कोणीतरी अज्ञात चोरटयानी घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करून
किचन मधील कपाटातील सोन्याचे तिन ग्रॅमचे मणी व चांदीच्या तोरडया व नगदी 10,000 असा एकून 26000/-  रू चा मुददेमाल चोरून नेला अशा फिर्यादीच्या फिर्याद वरून पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे दाखल अपराध क्रं. 166/2024 कलम 454,380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्हाचे घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी व अमंलदार यानी भेट दिली असता परिसरातील लोकाकडून व गुप्त बातमीदाराकडून आरोपीचे शरीरयष्ठी व रचनेनबाबत माहीती प्राप्त झाल्याने आरोपीने घरफोडी करण्यासाठी वापलेली पध्दत व आरोपीचे केलेल्या वर्णना वरून रेकॉर्डवील आरोपींची  झाडाझडती घेतली असता रेकॉर्डवरिल घरफोडीचा गुन्हेगार नामे



जब्बार खॉन वल्द रउफ खान वय 25 वर्षे रा. अन्सार नगर, अमरावती

याने सदर गुन्हा केल्याचे प्राथमीक तपासात निष्पन्न झाल्याने सदर
आरोपीला ताब्यात घेवून त्याचे कडून गुन्हातील चोरी गेलेल्या मुददेमालापैकी खालील मुददेमाल हस्तगत करण्यात आला
1) चांदीचे पैजन व लहान मुलाचे पायातील कळे
2) रोख रक्कम 6790/-रू
जप्त करून आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी पोलिस स्टेशन गाडगेनगर याचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेडडी,पोलिस उपायुक्त
सागर पाटील,सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 1 चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खॉन, सतीष देशमूख, नाईक पोलिस अमंलदार दिनेश नांदे, विकास गुडदे,पोलिस अमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहर चालक अमोल बाहदरपूरे, भुषन पदमणे, रोशन माहुरे, किशांर खेंगरे यानी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!