
गुन्हे शाखा प्रशासन विभागाची गुटखा विक्रेत्यांवर मोठी कार्यवाही…
गुन्हे शाखेच्या प्रशासन विभागाची गुटखा बाळगणार्यावर मोठी कार्यवाही….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नवनियुक्त पोलिस आयुक्तांनी अमरावती शहर पोलिस आयुक्त पदाचा नव्याने कार्यभार स्वीकारल्या नंतर पहील्याच गुन्हे आढावा बैठकी वेळी आयुक्तालय हद्दीतील अवैध्यरीत्या चालणाऱ्या व्यवसायावर कार्यवाही करुन त्याचे समुळ उच्चाटन करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.


त्यानुसार गुन्हे शाखेच्या (प्रशासन) विभागा कडील अधिकारी व अंमलदार यांचे विषेश पथकाने नागपुरी गेट पोलिस ठाणे हद्दीतील जमील कॉलनी ते आझाद कॉलनी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना दोन ईसम आटो रिक्शॅामधुन संशयीतरीत्या हालचाल करीत असतांना दिसुन आले. पथकाने त्यांचे जवळ जावुन विचारणा केली असता ते ईसम पळुन जात होते यावरुन त्यांना पोलिस पथकाने शिताफीने ताब्यात घेतले त्यांनतर त्याची विचारपुस केली असता त्याचे नाय 1) मोहसिन खान युनुस खान, वय 22 वर्ष, रा. नुरानी मज्जीद, कमेला ग्राउंड जवळ, अमरावती 2) आझाद खान शराफत खान, वय 42 वर्ष, रा. कमेला ग्राउंड ताज बेकरीच्या मागे, अमरावती असे सांगितले. तसेच त्यांचे कडील आटो रिक्शाची पाहाणी केली असता त्यांचे ताब्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा सद्रुष्य सुगंधीत पान मसाला मिळुन आला. सदर मालाबाबत श्री घनशाम पंजाबराव दंदे वय 48 वर्ष (अन्न व सुरक्षा अधिकारी) अन्न व औषध प्रशासन विभाग अमरावती यांचे कडुन तपासनी करुन घेतली असता त्यांनी सदरचा माल हा महाराष्ट्रा राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा असल्याची खात्री केली त्यांनतर वर नमुद ईसमां कडुन एकुन 6,19,803/- रुपये किंमतीचा गुटखा मुद्देमाल तसेच तिन चाकी आटो रिक्शा क्र. एम एच 27 बि डब्लु 0152 कि 4,00,000/-रु असा एकुन 10,19,803/- रु. चा मुद्देमाल मिळुन आला आहे.

सदर बाबत श्री घनशाम पंजाबराव दंदे वय 48 वर्ष (अन्न व सुरक्षा अधिकारी) अन्न व औषध प्रशासन विभाग अमरावती यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोस्टे नागपुरी गेट येथे अप क्र. 174/2025 कलम 245,123,270,271 बिएनएस तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 व नियमने 2011 चे कलम 26(2) 27(3),30(2),59 प्रमाने गुन्हे शाखेच्या करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास नागपुरी गेट पोलिस करीत आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अरविंद चावरीया,पोलिस उपआयुक्त गणेश शिंदे, पोलिस उपआयुक्त सागर पाटील, पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सिमा दाताळकर, सपोनि ईमरान नाईकवाडे, अन्न सुरक्षा अधिकारी श्री घनशाम दंदे, सपोउपनि युसुफ सौदागर, पोहवा अशोक वटाने, छोटेलाल यादव, शैलेश अर्डक, किशोर अंबुलकर, सुधिर गुडधे, पोना संजय बारसाखळे, नईम बेग, पोशि नरेश मोहरील, रामकृष्ण कांगडे, रुपेश काळे यांनी केलेली आहे.


