अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनीट १ ने संशईतांना ताब्यात घेऊन उघड केले ३ चैनस्नॅचिंगचे गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गुन्हे शाखा युनीट १ ने संशईताना ताब्यात घेऊन उघड केले ३ चैनस्नॅचीगचे गुन्हे,गुन्ह्यांत वापरलेल्या दुचाकीसह आरोपी अटकेत….

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती आयुक्तालय हद्दीत मागील काही दिवसापासून चैनस्नॅचीगच्या घटना घडत असल्याने पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी यानी सदर घटनेबाबत गुन्हेशाखेस सदर भागात पेट्रोलिंग  वाढवण्याबाबत तसेच रेकॉर्डवरिल गुन्हेगार चेकीग मोहीम सुरू करून सदर गुन्हे उघडकीस आणण्याबात आदेशीत केले होते





त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ०१ चे अधिकारी व अंमलदार हे प्रत्येक गुन्हाचे घटनास्थळाला भेट देत असताना त्याचे निदर्शनास आले कि ब-याच ठिकाणी दोन इसम हे दूपारचे वेळेस विरळ भागात पायदळ जाणा-या महीलांची सोनसाखळी हिसकवून पळून जात आहे. सदर घटनास्थळी असलेल्या सिसीटीव्ही फुटेज व गुप्तबातमीदारा कडून  मिळालेल्या माहीतीवरुन दोन इसमापैकी एक इसम हा सळपातळ व मोठे केस असलेला इसम आहे यावरुन गाडगेनगर, पो. ठाणे, अमरावती शहर येथील दाखल अपराध कं. ५७/२०२५ कलम ३०९ (४) भा. न्या. स. अन्वये गुन्हाचा संमातर तपास गुन्हे शाखा युनीट १. चे अधिकारी व अमलदार करत असताना असे निदर्शनास आले कि सदर गुन्हात हिरो कंपनीची डेस्टीन मोपेड असून त्यांचेवर दोन इसमापैकी मागे बसलेला इसमाचे वर्णन हे सळपातळ व मोठे केस असलेला आहे.



वरिल वर्णनाचे इसमाबाबत गुप्तबातमीदाराकडून माहीती घेतली असता सदर इसम हा इकबाल नगर चौक येथे असल्याची माहीती प्राप्त झाल्याने सदर इसमास पोलिस स्टाफ च्या मदतीने दि २० जानेवारी चे ५.०० वा ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव शेख इरफाने शेख जब्बार वय २० वर्षे रा. गुलीस्ता नगर अहमदीया मजिदजवळ पो.स्टे. नागपूरीगेट अमरावती असे सांगीतले त्याचेकडे बारकाईने तपास केला असता त्याने सदर गुन्हा त्याचा साथीदार  सैयद नावेद रा यास्मीन नगर याचे सोबतीने केल्याचे कबूल केल्याने सदर इसमाला ताब्यात घेतले असता त्यानी त्याचे सैयद तवेद उर्फ नावेद सैयद आबीद वय २६ वर्ष रा यास्मीन नगर चौक पो. स्टे नागपूरीगेट अमरावती असे सांगीतले



आरोपी शेख इरफाने शेख जब्बार याला विश्वासात घेवन त्याचेकडे बारकाईने तपास केला असता त्याने या व्यतरिक्त इतर दोन चैन स्नॅचीगच्या घटना केल्या असून सदर घटनेबाबत पोलिस अभिलेखाची माहीती घेतली असता सदर नमुद आरोपींनी १) पोलिस स्टेशन गाडगेनर अपराध के २५/२०२५ कलम ३०४(२) बि.एन.एस २) अर्जनगनर बसस्टॉप वरिल घटनेची कबुली दिली

तसेच आरोपी शेख इरफान शेख जब्बार याने देखील तिन चैन स्नॅचीगच्या घटना केल्या असून प्रत्येक घटनेमध्ये गाडी चालवणारे आरोपी (रायडर) हे वेगवेगळे असून ते अनुक्रमे १) शेख इरफाने शेख जब्बार वय २० वर्षे रा. गुलीस्ता नगर अहमदीया मजिदजवळ पो.स्टे. नागपूरीगेट (मुख्य आरोपी) २) शेख समीर उर्फ अमीका नवाब वल्द शेख युनूस वय २१ वर्ष रा. छायानगर पो. स्टे नागपूरी गेट अमरावती ३) शेख फैजान शेख रहीम वय १८ वर्ष रा यास्मीन नगर पो. स्टे नागपूरीगेट अमरावती ४) सैयद तवेद उर्फ नावेद सैयद आबीद वय २६ वर्ष रा यास्मीन नगर चौक पो. स्टे नागपूरीगेट तसेच तिन्ही गुन्हात घटनेच्या वेळी वापरण्यात आलेल्या मोटर १) हिरो होंडा कंपनीची पेंशन प्रो MH-27-AX-2387 २) हिरो होंडा कंपनीची ग्लॅमर MH-27-AM-5833 3) हिरो कंपनीची डेस्टीन विना नंबर कंमाकाची

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचन्द्र रेडडी, पोलिस उपायुक्त (मुख्यालय)कल्पना बारवकार, पोलिस उपायुक्त परिमंडळ १ सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री अरून पाटील, गाडगेनगर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली युनिट कं. ०१ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा सतीष देशमूख, पोहवा फिरोज खॉन, सचिन बहाळे, अलीमउददीन खतीब, नापोशि नाझीमउददीन सैयद, सचिन भोयर, विकास गुडदे,पोशि सुरज चव्हाण, निखील गेडाम, चालक, रोशन माहुरे, किशोर खेंगरे तसचे पोलिस स्टेशन सायबर चे सपोनि अनिकेत कासार,पोशि निखील माहूरे, अनिकेत वानखडे यानी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!